शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर; सरकारची काटकसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

स्टार ७७१ लाभार्थी बुचकळ्यात : अंगणवाडी स्तरावरून होते वाटप; कोरोनाचा आहारावर परिणाम जळगाव : बालके व मातांना संपूर्ण पोषण ...

स्टार ७७१

लाभार्थी बुचकळ्यात : अंगणवाडी स्तरावरून होते वाटप; कोरोनाचा आहारावर परिणाम

जळगाव : बालके व मातांना संपूर्ण पोषण मिळावे यासाठी सरकारकडून आता धान्याचा पुरवठा केला जात असून, अंगणवाडी स्तरावर तो संबंधित लाभार्थींपर्यंत पोहोचतो. मात्र, यात वारंवार होणारे बदल हे लाभार्थींना बुचकळ्यात टाकत आहेत. कोरोनामुळे शिजविलेला आहार देणे बंद करण्यात आले व धान्याचे वाटप सुरू झाले; मात्र आता यातही तेलाऐवजी साखर देण्याचा निर्णय झाल्याने हा आहार पूर्ण कसा होणार, असा प्रश्न गरोदर महिला व स्तनदा माता या लाभार्थींसमोर आहे.

साखर व तेल यांतून मिळणाऱ्या कॅलरीजची मोजणी सरकारने केल्यानंतर दोघांमधून सारख्याच कॅलरीज मिळतात, असे निष्पन्न झाल्यानंतर तेलापेक्षा साखर स्वस्त असल्याने तेलाऐवजी या लाभार्थींना आता साखर देण्याचा निर्णय गेल्या तीन महिन्यांपासून सरकारी पातळीवर घेण्यात आला आहे. कॅलरीजचे प्रमाण सारखे असले तरी यातून पदार्थ बनवायचे नेमके कसे याचे उत्तर नाही. त्यामुळे लाभार्थींपुढे यात शिजवायचे काय व खायचे काय हा प्रश्न उभा राहिला असून, शासनाचे याकडे लक्ष देण्याची मागणी आता समोर येत आहे. प्रत्येक लाभार्थी २० ग्रॅम साखर अशी ५० दिवस साधारण एक किलो साखर दिली जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण अधिकारी आर.आर. तडवी यांनी दिली.

लाभार्थी

शून्य ते ६ वर्ष वयोगट : २,७४,४१२

गरोदर महिला : २२,८८७

स्तनदा माता : २२,८५५

काय काय मिळते

१ अंगणवाडीच्या माध्यमातून आधी लहान मुलांना शिजविलेला आहार दिला जात होता. मात्र, कोरोनाकाळात आलेल्या निर्बंधामुळे मागच्या वर्षापासून यात बदल करण्यात आले आहेत.

२ चना, मसूर दाळ, गहू, मिरची पावडर, हळद, साखर हे धान्य आता दिले जात आहे.

३ तीन ते चार महिन्यांपूर्वी या धान्यात साखरेऐवजी तेलाचा समावेश होता; मात्र आता साखर देण्यात येत आहे.

कोट

अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थींना हे घरपोच धान्य पोहोचविले जात आहे. तेल व साखर यांच्यात कॅलरीजचे प्रमाण सारखेच असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच हा निर्णय झाला आहे. जिल्हाभरात केंद्राकडून धान्य यायला उशीर झाल्यानेच मध्यंतरी उशीर झाला होता. मात्र, आपल्याकडे धान्य वाटपात कुठलाच खंड पडलेला नसून ते नियमित वाटप सुरू आहे.

- आर.आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी