शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्यने मिळवलेय आंतररराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चैतन्य विजय इनामदार याने जळगावच्या तायक्वांदो संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्यात त्याने सातत्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चैतन्य विजय इनामदार याने जळगावच्या तायक्वांदो संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्यात त्याने सातत्याने यश मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळला आणि मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील पदकांची कमाई केली. त्याने २०१९ च्या जूनमध्ये इंडिया ओपन तायक्वांदोमध्ये तर दक्षिण आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

चैतन्य इनामदार हा मूळचा पुण्याचा आहे. मात्र तायक्वांदोसाठी जळगावमध्ये असलेली प्रशिक्षण सुविधा आणि उपलब्ध असलेले प्रायोजक बघून तो जळगावला आला. त्यानंतर त्याने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली. त्याला जळगावमध्ये तायक्वांदो प्रशिक्षक अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्याने आपला खेळातील दबदबा दाखवून दिला. त्याने ८७ किलो वरील गटात त्याने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली.

२०१२ मध्येच जळगावला झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केली. त्यानंतर ३४ व्या अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेत खेळताना आपल्या खेळाचा दम दाखवला. नंतर चॅलेंज द चॅम्पियन आणि काश्मीर ओपन या स्पर्धांमध्ये खेळून त्याने ८७ किलोवरील गटात आपल्या खेळाचा दम दाखवला.

२०१९ हे वर्ष त्याच्यासाठी खास महत्त्वाचे ठरले. त्याने जून महिन्यात झालेल्या इंडिया ओपनमध्ये रौप्यपदक पटकावले. नंतर लगेचच झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावले. एकाच वर्षी दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावल्याने त्यांच्या कामगिरीची चर्चा झाली. मात्र हीच स्पर्धा त्याच्यासाठी अखेरची मोठी स्पर्धा ठरली. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्वच स्पर्धा बंद झाल्या. मात्र तरीही चैतन्य याने जिद्द सोडली नाही. त्याने घरीच सराव सुरू ठेवला आहे.

कोट - सध्या घरीच सराव सुरू आहे. मधल्या काळात काही प्रशिक्षण शिबिरांना गेलो होतो. मात्र लगेचच लॉकडाऊनदेखील सुरू झाले. भविष्यात ज्या स्पर्धा होतील त्यांच्यासाठी सध्या तयारी सुरू आहे. - चैतन्य विजय इनामदार, तायक्वांदो खेळाडू

इंडिया ओपन सिल्व्हर - २०१९ जून

साऊथ एशियन गेम्स ब्रॉन्झ २०१९ डिसेंबर