शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

संयम, मेहनत व आत्मविश्वास या जोरावर मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST

रवींद्र मोराणकर जळगाव : संयम, मेहनत आणि आत्मविश्वास या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा ...

रवींद्र मोराणकर

जळगाव : संयम, मेहनत आणि आत्मविश्वास या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षेत यश मिळवीत देशात चौथा, तसेच राज्यात प्रथम क्रमांक मिळविला, असे हर्षदा नंदलाल छाजेड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील कळमसरे (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी असलेले छाजेड कुटुंब व्यवसायानिमित्त धुळे जिल्ह्यातील फागणे येथे स्थायिक झाले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, यूपीएससीचा हा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात २०१९ मध्ये माझी मुलाखतीस निवड झाली. मात्र मी अंतिम गुणवत्ता यादीत येऊ शकले नाही; परंतु आणखी मेहनत घेऊन पुढील वर्षी २०२० मध्ये भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) या परीक्षेत उत्तीर्ण झाले. देशात चौथे आणि राज्यात प्रथम स्थान मिळविले.

सध्या मी धुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात सांख्यिकी विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे.

या परीक्षेचा अभ्यास मी पुणे येथे राहूनच केला. अभ्यासात सातत्य असल्याने यश मिळाले.

भारतीय सांख्यिकी सेवा या परीक्षेचा अभ्यास करीत असताना पहिले पूर्ण अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका याचा अभ्यास केला, नंतर विस्तृत अभ्यास केला. त्यात नोटस् बनविणे आणि खूप सारा सराव आणि सोबत ध्यान साधनादेखील केली.

माझे वडील पाच वर्षांपूर्वी वारले. त्यानंतर माझा सांभाळ माझे काका प्रकाशचंदजी नंदलालजी छाजेड यांनी केला. त्यांनी मला पूर्णपणे पाठिंबा दिला व त्यामुळेच आज हे शक्य होऊ शकले आहे.

शेवटी एवढेच सांगेल की संयम, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळते.