शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

लेखापरीक्षकाला दीड लाख देण्यासाठी वर्गणी !

By admin | Updated: May 30, 2017 11:15 IST

मनपा अभियंत्यांना निरोप : आयुक्तांकडे तक्रार; ऑडीटरसह नगररचनाच्या दोन्ही अभियंत्यांकडून मागविला खुलासा

ऑनलाईन लोकमत/ सुशील देवकर 

जळगाव,दि.30- मनपात सध्या सुरू असलेल्या स्थानिक निधी लेखा विभाग, औरंगाबाद या कार्यालयातर्फे 2014-15 या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षणात नगररचना विभागातील कामकाजावर आक्षेप येऊ नयेत, यासाठी लेखापरीक्षकाला (ऑडीटरला) देण्याकरिता या विभागात काम करणा:या व केलेल्या सर्व अभियंत्यांनी वर्गणी करून दीड लाख रुपये गोळा करून देण्याचा निरोप नगररचनातील दोघा अभियंत्यांनी अन्य अभियंत्यांना दिला .
 याबाबत नगररचनात काम केलेले सहायक नगररचनाकार व सध्या बांधकाम विभागात कार्यरत असलेले अरविंद भोसले यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. आयुक्तांनी ऑडीटरसह पैशांचा निरोप पोहोचविणा:या दोघा अभियंत्यांकडून खुलासा मागविला असून त्यानंतर याबाबत पुढील कारवाई केली जाणार आहे. 
मनपात सध्या स्थानिक निधी लेखा, औरंगाबाद या कार्यालयातील लेखापरीक्षकांच्या पथकाकडून मनपातील विविध विभागांचे लेखापरीक्षण केले जात आहे. त्यात नगररचना विभागातील कामकाजाचे लेखापरीक्षण करणा:या लेखापरीक्षकाने कामकाजावर काही आक्षेप घेऊ नयेत, यासाठी त्यांना दीड लाख रुपये सर्व आजी-माजी अभियंते मिळून गोळा करून द्या, असा निरोप नगररचना विभागातील रचना सहाय्यक विजय मराठे व सहायक नगररचनाकार भास्कर भोळे यांनी नगररचना विभागातील माजी सहायक नगररचनाकार व सध्या बांधकाम विभागातील सहायक अभियंता अरविंद भोसले यांना दिला. पहिल्यांदा भोसले यांनी या निरोपाकडे दुर्लक्ष केले. आपण काहीही चुकीचे काम केलेले नसल्याने आक्षेपांची भीती आपल्याला नाही. मग पैसे कशासाठी द्यायचे? असा सवाल निरोप देणा:या अभियंत्याला केला. मात्र त्यानंतरही दोन वेळा निरोप आल्याने अखेर भोसले यांनी चित्रशाखेत बसून लेखापरीक्षण करीत असलेल्या लेखापरीक्षकाची भेट घेतली. त्यावेळी भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर फाईल्समध्ये काय त्रुटी शोधल्या? अशी विचारणा केली. मात्र काहीही त्रुटी निघाल्या नसल्याचे संबंधित लेखापरीक्षकाने मान्य केले. मात्र तरीही काहीतरी करून टाका असे सुचविले. त्यास भोसले यांनी नकार देत थेट मनपा आयुक्तांकडेच याबाबत लेखी तक्रार केली. त्यात विजय मराठे व भोळे यांच्यासह ऑडीटरच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान उपायुक्तांसमोर लेखापरीक्षक बसलेले असतानाही हा विषय झाला असून त्यावेळी लेखापरीक्षकांनी त्यांच्याकडून चूक झाल्याचे मान्य केल्याचे समजते. याबाबत आयुक्तांच्या सूचनेवरून उपायुक्तांनी संबंधित लेखापरीक्षक, तसेच मराठे व भोळे यांना नोटीस बजावून लेखी खुलासा मागविला आहे. 
एलबीटी वसूल न करता परवानगी
लेखापरीक्षण कालावधित एलबीटी लागू असतानाही तो भरण्यास टाळाटाळ केल्याने बांधकाम परवानगी भोसले यांनी राखून ठेवली आहे. नंतर 50 कोटींच्या आत उलाढाल असलेल्यांची एलबीटी रद्दचा निर्णय होताच परस्पर संबंधित रोखून ठेवलेल्या बांधकाम परवानगी एलबीटी वसून न करताच आयुक्तांना विश्वासात न घेता परवानगी दिल्याचे उघड झाले असल्याचे समजते. त्यात आपण अडचणीत येऊ नये यासाठी त्यांनी सगळ्यांकडून पैसे वसूल करून देण्याचे आश्वासन लेखापरीक्षकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
माङयाकडे भोसले यांचा लेखी तक्रारअर्ज प्राप्त झाला असून त्यानुसार उपायुक्तांना सूचना केली आहे. उपायुक्तांनी संबंधित लेखापरीक्षक, तसेच भोळे व मराठे यांना नोटीस बजावून लेखी खुलासा मागविला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
-जीवन सोनवणे, आयुक्त, मनपा.