शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सबगव्हानला नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 19:29 IST

स्वत:च्या शेतात घेतला गळफास

अमळनेर : सबगव्हान येथील दगडू वेडू पाटील (वय २८) या तरुणाने लग्न जमत नसल्याने नैराश्यातून दिनांक २६ रोजी पहाटे स्वत: चे शेतात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेबाबत माहिती अशी की, दगडू हा अमळनेर येथील नेत्ररोगतज्ञ डॉ. नरेंद्र महाजन यांच्याकडे नऊ हजार रुपये महिन्याने कामावर होता. या तरुणाकडे फक्त दोन एकर शेती असल्याने तो बाहेर कामावर होता. गावात साधे घर व कमी जमीन असल्याने लग्न जुळून येत नव्हते म्हणून तो नैराश्याने ग्रासलेले होता. रोजी रोटी साठी कमवून ही मुलगी मिळत नाही व लग्न जुळून येत नाही म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या सबगव्हान शिवारातील शेतातील निंबच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन पहाटे आपली जीवनयात्रा संपविली. २६ रोजी सकाळी ८ वाजता गावातील शेतकरी अविनाश भीमराव पाटील हे शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांना दगडू याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी गावात ही माहिती दिली तसेच पोलिसानाही कळविण्यात आले. यानंतर मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव, हवालदार भास्कर चव्हाण यांनी घटनास्थळी शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा केला व दगडूचे वडील आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आल्यावर दुपारी ५ वाजता सबगव्हान येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत.