शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची दमछाक

By admin | Updated: February 27, 2017 01:08 IST

राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.

जळगाव : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवीच्या ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाच्या प्रश्न पत्रिका संच ‘डी’मध्ये प्रश्न क्रमांक ९ ते ११ हे  चुकीचे असल्याचे  समोर आले आहेत. हे तिन्ही प्रश्न परिच्छेद वाचून सोडविण्याचा सूचना प्रश्नपत्रिकेत देण्यात आल्या. मात्र प्रश्नपत्रिकेत संबधित प्रश्नांचा एक ही परिच्छेद नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेलाराज्य परीक्षा परिषदेतर्फे या वर्षांपासून  इयत्ता ४ थी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील २१३ परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. मात्र इयत्ता पाचवीच्या ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाच्या ‘डी’ प्रश्नपत्रिका संचातील तीन प्रश्नांच्या घोळ मुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. याबाबत मनसेचे माजी महानगरप्रमुख विरेश पाटील व सचिव अविनाश पाटील या जागृत पालकांनी नाराजी व्यक्त केली.काय आहे प्रकारशिष्यवृत्ती परीक्षेसाठी  इयत्ता पाचवीचे दोन पेपर घेण्यात आले. दुपारी १.३० ते ३ वाजेदरम्यान ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाचा  पेपर घेण्यात आला. यामध्ये डी संचात प्रश्न क्रमांक ९ ते ११ या तीन प्रश्नासाठी परिच्छेद वाचून त्यावर आधारीत  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र विचारलेल्या प्रश्नांसंबधीचा परिच्छेद प्रश्न पत्रिकेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविताना अडचणी आल्या. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षकांकडे तक्रारी करण्यात आल्या. चुकांबद्दल कोणतीही तक्रार पालक वर्गाकडून आली नाही.  तक्रार आल्यास संबधित प्रश्नांबाबत महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेला तो अहवाल पाठविला जाईल.  विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. -बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग३२ हजार १६५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षाशिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३३ हजार  ८६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३२ हजार १६५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १ हजार ७०३ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले. इयत्ता पाचवी चे १२४६ तर आठवीचे ४५७ विद्यार्थी गैरहजर राहिले. यंदापासून शिष्यवृती परीक्षेसाठी बहुसंच प्रश्न पत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे देखील विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.