शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतून करावा लागतो जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:11 IST

हिवरी व हिवरखेडा गावातील स्थिती : पावसाळ्यात गावकऱ्यांना इतर गावांशी संपर्क साधणे होते कठीण

मनोज जोशी।पहूर,ता. जामनेर : हिवरी व हिवरखेडा गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून वाघूर नदीच्या पाण्यातून जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यातून बिकट वाट काढावी लागत असून याठिकाणी पुलाची मागणी पाच ते सहा वर्षांपासून असताना या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.हिवरी व हिवरखेडा जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गाव असून दोन्ही गावांच्या मधून वाघूर नदी वाहते. नदीचे पात्र मोठे असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी असते. हिवरी व हिवरखेडा गावातील लोकांना दोन्ही गावात जाण्यासाठी नदी ओलांडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचप्रमाणे पिंपळगाव कमानी, जांभूळ, वडगाव या गावांना जाण्यासाठी हिवरखेडा- पिंपळगाव हा रस्ता सोयीस्कर असून दळणवळणाच्या साधनांबरोबर शेतात जाण्यासाठी हा रस्ता मुख्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना नदीच्या पाण्यातून बिकट वाट काढून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे हा जिवघेणा खेळ काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही गावांच्या संपकार्साठी पुलाची मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.जलसंपदा मंत्र्यांना ग्रामपंचायतकडून पत्रहिवरखेडा दिगर व हिवरी या दोन्ही गावांच्यामध्ये फरशी पुल करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व वाघूर लघूपाटबंधारे विभाग यांच्याकडे वडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती सरंपच केशव पाटील यांनी दिलीे.