शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती नगरात हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

हॉकर्सकडून पावती फाडून मनपाकडून माल जप्त : हॉकर्स संतप्त; जप्त केलेला माल टाकलेल्या ट्रॅक्टरची चावी पळवली लोकमत न्यूज ...

हॉकर्सकडून पावती फाडून मनपाकडून माल जप्त : हॉकर्स संतप्त; जप्त केलेला माल टाकलेल्या ट्रॅक्टरची चावी पळवली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात आठवडा बाजाराला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत आठवडा बाजार भरत असून, त्याठिकाणी मनपाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, बुधवारी शहरातील निवृत्ती नगर भागात भरलेल्या बाजारातील हॉकर्सकडून पावत्या फाडल्या व त्यानंतर काही वेळात मनपाच्या पथकाने माल जप्त केल्यामुळे संतापलेले हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये सकाळी १० वाजेच्या सुमारास चांगलीच झटापट झाली. हॉकर्सवर कारवाई करायचीच होती तर मग पावत्या का फाडल्या, असा प्रश्न करत हॉकर्सने मनपाच्या कारवाईचा विरोध केला.

दर बुधवारी शहरातील पिंप्राळा बाजारात आठवडा बाजार भरत असतो. मात्र, कोरोनामुळे आठवडा बाजार भरण्यास बंदी असल्याने पिंप्राळा भागात दर बुधवारी हॉकर्स बसण्याआधीच मनपाचे पथक दाखल होत असते. त्यामुळे हॉकर्सने देखील पिंप्राळ्यात बाजार न भरविता दर बुधवारी निवृत्ती नगरात बाजार भरवायला सुरुवात केली होती. याबाबत बुधवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर मनपाच्या पथकाने बुधवारी सकाळी १० वाजता जाऊन हॉकर्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

भाजीपाल्यावर झोपून कारवाईला केला विरोध

मनपाचे पथक दाखल होताच या भागात हॉकर्सने आपला माल जमा करून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनी हा माल हिसकावून घेत जप्त करण्यास सुरुवात केली. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या हॉकर्सने कारवाईस विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र, मनपाकडून माल जप्त करण्यास सुरुवात झाल्यामुळे अनेक हॉकर्सने आपला माल जप्त होऊ नये म्हणून भाजीपाल्यावर झोपून कारवाई करू नका, म्हणून मनपा कर्मचाऱ्यांकडे विनवण्या केल्या.

पावत्या फाडल्या तर कारवाई का?

निवृत्ती नगरात हॉकर्सने दुकाने थाटल्यानंतर विक्रेत्यांकडून दैनंदिन बाजार शुल्काची पावती फाडण्यात आली. मात्र, तरीही मनपाकडून कारवाई झाल्याने अनेक हॉकर्सने संतापात मनपा कर्मचाऱ्यांना विरोध केला. यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच माल जप्त करायचाच होता तर पावत्या का फाडल्या गेल्या, असाही प्रश्न हॉकर्सने उपस्थित केला. दरम्यान, काही हॉकर्सनी मनपा कर्मचाऱ्यांनी मालासोबत पैसे देखील जप्त केल्याचा आरोप यावेळी केला.

ट्रॅक्टरची चावी केली गायब

मनपा कर्मचाऱ्यांनी हॉकर्सकडून जप्त केलेला माल ट्रॅक्टरमध्ये जमा केल्यानंतर काही जणांनी ट्रॅक्टरची चावी गायब केली. यामुळे ट्रॅक्टर सुरू झाले नाही. त्यामुळे अनेक हॉकर्स आपला जितका माल वाचविता येईल, तितका वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच मनपाच्या पथकाने देखील अनेक हॉकर्सचा माल परत देखील केला. काही वेळानंतर ही चावी सापडली.