शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

रावेरमधील तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:40 IST

सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातानंतर शासनाने महामार्गावरील जीर्ण व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा फतवा काढल्यानंतर तालुक्यातील रावेर ते विवरे दरम्यान असलेल्या नागझिरी नदीवरील, पारशा नाल्यावरील व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांच्या पीलरचे मजबुतीकरण व पुलांचे रुंदीकरण करण्यात आल्याची माहिती रावेर व सावदा उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी दिली.

ठळक मुद्देसावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेनंतर सावध उपाय कर्जोद नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातानंतर शासनाने महामार्गावरील जीर्ण व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा फतवा काढल्यानंतर तालुक्यातील रावेर ते विवरे दरम्यान असलेल्या नागझिरी नदीवरील, पारशा नाल्यावरील व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्यांच्या पीलरचे मजबुतीकरण व पुलांचे रुंदीकरण करण्यात आल्याची माहिती रावेर व सावदा उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता इम्रान शेख यांनी दिली.सावित्री नदीवरील पुल कोसळून पडण्याच्या घटनेपूर्वी बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील सावदा शहरातील गुरांच्या बाजारासमोरील पुल कोसळून पडल्याची दुर्घटना घडली होती. त्या अनुषंगाने याच राज्य महामार्गावर वडगाव ते वाघोदा दरम्यान असलेल्या सुकी नदीवरील जुन्या व जीर्ण पुलाच्या पिलर्सच्या पायाखालचा भूस्तर खचून वाहून गेल्याची बाब ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणली होती. तत्संबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घेऊन त्या पुलाच्या पिलर्सच्या पायाचे व पिलर्सचेही काँक्रिटीकरणाने मजबूतीकरण केले होते.सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने जीर्ण व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावदा उपविभागीय क्षेत्रात असलेल्या वडगाव-वाघोदा दरम्यानच्या पुलाचे मजबुतीकरण तत्पूर्वीच झाल्याने एकही जीर्ण व जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची गरज नव्हती.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रावेर उपविभागीय कार्यक्षेत्रात बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यानच्या रावेर शहरालगत असलेल्या नागझिरी नदीवरील पुलाचे, पारशा नाल्यावरील पुलाचे व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलांचे आॅडीट करण्यात आले होते. संबंधित पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार शहरातील नागझिरी नदीवरील पुलाचे पिलर्सचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. रावेर-विवरे दरम्यानच्या पारशा नाल्यावरील व श्री बिजासनी माता मंदिरासमोरील मात्राण नाल्यावरील पुलाचे पिलर्सचे व त्यांच्या पायांचे मजबुतीकरण करून तथा या दोन्ही पुलांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे.तीनही पुलांच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी अंदाजे ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्ची पडली.दरम्यान, रावेर ते बºहाणपूर दरम्यान असलेल्या भोकर नदीवरील व कर्जोद नाल्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे होते. मात्र स्ट्रक्चरल आॅडिट झाले नसले तरी कर्जोद नाल्यावरील पुलाचे मजबुतीकरण करण्यात आल्याची पुष्टीही इम्रान शेख यांनी जोडली आहे.