शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

वाहतूक पोलीस व वाहनधारकात जोरदार वाद

By admin | Updated: February 7, 2017 01:24 IST

आकाशवाणी चौकातील घटना : कारवाई टाळण्यासाठी वाहतूक पोलिसाने पैसे मागितल्याचा केला आरोप

जळगाव : सीटबेल्टच्या कारवाईवरुन वाहतूक पोलीस व कार चालक यांच्यात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी चौकात जोरदार वाद झाला. या वादाचे मोबाईलमध्ये चित्रण करणा:या तथाकथित पत्रकारानेही पोलिसांशी वाद घातला. अर्धा तास जागेवर सुरु असलेला हा वाद शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयार्पयत पोहचला. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी कारचालकाने पोलिसांवरच पैसे मागितल्याचा आरोप केला.शहर वाहतूक शाखेचे विजय जोशी, संजय पाटील, विनोद चौधरी व योगेश पवार या कर्मचा:यांची सोमवारी आकाशवाणी चौकात डय़ुटी लावण्यात आली होती. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नशिराबादकडून धरणगावकडे जाणारी कार (क्र.एम.एच.04 सी.डी.7236) पोलिसांनी अडवली. 50 रुपये नको 200 चा मेमा घ्यायोगेश पवार यांनी चालक निसार अहमद पटेल (रा.साळवा, ता.धरणगाव) यांच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली असता त्यांनी ते दाखविले. सीट बेल्ट लावला नसल्याने पवार यांनी दोनशे रुपयांचा मेमो घेण्याचे सांगितले असता चालकाने 50 रुपये घेवून तंटा मिटवा असा सल्ला दिला, त्यास पवार यांनी नकार दिला. मेमो घ्यावाच लागेल असे स्पष्ट केल्यानंतर पटेल यांनी पवार यांच्याशी वाद घातला. हा वाद पाहून गर्दी गोळा झाल्याने पटेल यांनी पवार यांच्यावर 500 रुपये मागितल्याचा आरोप केला. यावेळी चौधरी, पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रय} केला, मात्र वाद आणखीनच चिघळला. यावेळी पटेल याने पोलिसांच्या अंगावर कार नेण्याचा प्रय} केला.शुटींग करणा:याने केली शिवीगाळहा वाद सुरु असताना निलेश वर्मा या दुचाकीस्वाराने वादाची मोबाईलमध्ये शुटींग करायला सुरुवात केली. विजय जोशी यांनी त्याला जाब विचारला असता मी पत्रकार आहे, म्हणून शुटींग करत असल्याचे सांगितले.त्याच्याकडे ओळखपत्र मागितले असता मी सोशल मीडियाचे काम करतो, त्याला ओळखपत्राची गरज नसते असे सांगितले. वर्मा याच्या दुचाकीची क्रमांक (एम.एच.19 सी.एन.359) विचित्र असल्याने त्याचीही दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. यावेळी वर्मा याने शिवीगाळ केली असे पोलिसांचे म्हणणे आहे. कारचालकासोबत त्यालाही शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले, मात्र नंतर त्याला सोडण्यात आले.वाद पोहचला वाहतूक शाखेच्या कार्यालयातधरणगावच्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याशी पटेल यांनी संपर्क साधला, मात्र सहायक निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी त्याची समजूत घातली व दंडाची रक्कम वसूल करुन कार सोडली. दरम्यान, प्रत्येक कर्मचा:याला दहा दिवसाला दहा मेमोचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट पूर्ण करताना अनेकांशी वाद होत आहेत.वाहने अडविल्याने वाहतूक होते विस्कळीतमहामार्गावर पासिंग पाहून अवजड वाहने अडविण्यात येतात त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असते. पिंप्राळ्यात दर बुधवारी बाजार भरतो, असे असतानाही पोलीस या परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी वाहने अडवितात, अशीही तक्रार नागरिकांनी केली आहे. वाहन क्रमांक पाहून वाहन अडविण्याचे प्रमाण वाढलेमहामार्गावर वाहनांची नंबर प्लेट पाहून वाहने अडविली जातात. सोमवारही धरणगावची एक कार अडविण्यात आली, तिची पासिंग ठाण्याची होती, त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी तिला अडविली. यावेळी झालेल्या पैशाच्या आरोप-प्रत्यारोपातून वादाची ठिणगी पडली.जानेवारी महिन्यात छत्तीसगडच्या तरुणांशी झाला होता वादगेल्या महिन्यातही छत्तीसगडच्या तरुणांची कार वाहतूक पोलिसांनी अडविली होती, तेव्हा देखील मोठा वाद झाला होता. शिर्डीहून येणा:या या तरुणांनी पोलिसांवर पैशाचे आरोप केले होते. पैसे मागितल्याचा प्रकार त्यांनी मोबाईलच्या कॅमे:यात शूट केल्याने पोलिसांना नमते घ्यावे लागले होते.  त्यानंतर आज पुन्हा वाहनधारकाशी वाद झाला.इच्छादेवी चौकातही वादरविवारी दुपारी साडे चार वाजता इच्छादेवी चौकातही एक कार चालक व वाहतूक पोलीस यांच्यात वाद झाला होता. वाहतूक शाखेचे रवींद्र मोरे यांनी त्याला अडविले होते, त्याने मेमो न घेता मोरे यांना शिवीगाळ करुन पळ काढला होता. ही कार जळगाव जिल्ह्यातीलच होती. आरटीओ कार्यालयातून कार मालकाची माहिती काढली जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.दुरुस्तीसाठी सिगAल यंत्रणा बंदआकाशवाणी चौकात सोमवारी दिवसभर सिगAल यंत्रणा बंद होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. रविवारी वाहतूक कमी असते, त्यामुळे त्याच दिवशी सिगAल दुरुस्तीचे काम करणे अपेक्षित असताना सोमवारी हे काम हाती घेण्यात आले. सिग्नल बंद असल्याने सोमवारी अनेक वाहनधारकांचा पोलिसांशी वाद झाला.एकाच चौकात पोलिसांची गर्दी कशासाठी?एकीकडे असुरक्षित असलेल्या या महामार्गावर वारंवार अपघात होत असताना महामार्गावर एकाच चौकात चार ते पाच पोलीस कार्यरत असतात. इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्मचारी नेमूनही वाहतूक सुरळीत होत नाही. दोन कर्मचा:यांची गरज असताना चार कर्मचारी कशासाठी नेमले जातात असा सवाल वाहनधारकांकडून केला जातो.सिगAल नसलेल्या ठिकाणी पोलीस तैनात करा सिगAल नसलेल्या ठिकठिकाणी वाहतूक पोलीस नसतात, तेथे कर्मचारी नियुक्त करण्यास वाहतूक शाखेला अडचण काय? असाही सवाल उपस्थित होत आहे. सिगAल नसलेल्या चौकात म्हणजेच डॉ.अग्रवाल हॉस्पिटल चौक, शिव कॉलनी चौक, मानराज पार्क खोटेनगर, मिल्लत हायस्कूल या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती का केली जात नाही?