कानळदा ग्रा.पं.तर्फे शिक्षकांचा सत्कार
जळगाव : कानळदा येथे ग्रामस्थांतर्फे गाव व परिसरातील शिक्षकांचा सत्कार ग्रामपंचायत येथे केला. यावेळी आदर्श विद्यालय कानळदा, जिल्हा परिषद शाळा मुले व मुली तसेच परिसरातील शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल ससे (प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह) तर अध्यक्षस्थानी कानळद्याचे सरपंच पुंडलिक सपकाळे हे होते. सूत्रसंचालन ग्रा.पं.सदस्य जगदीश सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन भिकन सपकाळे यांनी मानले.
इनरव्हील क्लबतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनतर्फे रविवारी लीलाई मुलांचे बालकाश्रम येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी कपोळ समाज अध्यक्ष निरुपमा मिलन मेहता, सेक्रेटरी यतीन मेहता व इनरव्हील अध्यक्ष नेहा संघवी, सेक्रेटरी इशिता दोषी, गुंजन कथुरिया यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिमल मेहता, मिलन मेहता, सौरभ मेहता, कौशिक मेहता, नीता मेहता, वीणा मेहता, जागृती मेहता, विरल मेहता, स्नेहा मेहता, आरती मेहता, काजल मेहता, गौरव मेहता, प्रिया मेहता, तुषार दोषी यांची उपस्थिती होती.