शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात प्लॅस्टीकमुक्त अभियानाला ‘कापडी पिशवी’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:07 IST

रोटरीचा अभिनव उपक्रम : दिव्यांग भगिनींची प्रेरणादायी साथ

ठळक मुद्देमहिलांकडूुन चांगला प्रतिसाद सहभागाचे टाके स्फुर्तीची पिशवीपाच हजार पिशव्या देणार 

ऑनलाईन लोकमत  

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 11 - नगर पालिकेतर्फे संपूर्ण चाळीसगाव शहरात प्लॅस्टीकमुक्त अभियान राबविले जात असून रोटरी क्लबच्या माध्यमातून स्वयंदीप दिव्यांग भगिनींनीही या अभियानामागे त्यांनी तयार केलेल्या कापडी पिशवीचे बळ उभे केले आहे. रोटरीचे सदस्य दररोज प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन विशेषत:  महिला वर्गाकडून जुन्या साडय़ांचे संकलन करीत असून  स्वयंदीपच्या दिव्यांग भगिनी याच साड्यांच्या कापडी पिशव्या बनवित आहेत.रोटरी सदस्यांनी गेल्या तीन दिवसात 382 साडय़ा संकलित केल्या तर दिव्यांग भगिनींनी 50हून अधिक पिशव्या शिवून तयार केल्या.महिलांकडूुन चांगला प्रतिसाद रोटरी क्लबचे अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे यांच्या कल्पक पुढाकारातून या अभियानाला सुरुवात झाली. त्यांच्यासह राजेंद्र कटारिया, बाळासाहेब सोनवणे, हरिश पल्लण, रोशन ताथेड, रोटरॅक्टचे कुलदीप चौधरी, सौरभ गुप्ता, राहुल वाकलकर, आदींनी 8 पासून जुन्या साडय़ा संकलन करण्यास सुरुवात केली. तीन दिवसात महिलांनी स्वयंस्फुतीर्ने 382 जुन्या साडय़ा कापडी पिशव्या तयार करण्यासाठी दिल्या. पवार वाडी परिसरात दोन दिवसात 301 तर विमानतळ परिसरातुन गुरुवारी 81 साडय़ा संकलीत करण्यात आल्या. अंकुर साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्ष साधना निकम, नगरसेवक चिराग शेख, भास्कर पाटील यांच्या उपस्थिती मंगळवारी उपक्रमाला सुरुवात झाली.  सहभागाचे टाके स्फुर्तीची पिशवीस्वयंदीपच्या दिव्यांग भगिनींनी शिवणकाम उद्योग  उभारला आहे. प्लॅस्टीकमुक्त अभियानात आपलाही खारीचा वाटा असावा या प्रामाणिक प्रेरणेतून त्यांनी जुन्या साडय़ांपासून कापडी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दिव्यांग असलो तरी आम्ही देखील समाज घटक आहोत. त्यामुळे आमचेही उत्तरदायित्व आहेच. ते आम्ही पुर्ण करु. नागरिकांनीही प्ल?स्टीकचा वापर टाळून कापडी पिशवीचा अधिकाधिक वापर करावा. असे आवाहन स्वयंदीपच्या प्रमुख मिनाक्षी निकम यांनी लोकमतशी बोलतांना केले. पाच हजार पिशव्या देणार पर्यावरणाचे रक्षण, नागरिकांचे प्रबोधन आणि दिव्यांग भगिनींना अल्पशी मदत अशा तिहेरी सुञात रोटरीने हा उपक्रम गुंफला आहे. आमदार उन्मेष पाटील यांनी प्लॅस्टीकमुक्त चाळीसगाव अभियानाची साद घातली. आम्ही त्याला उपक्रमाव्दारे प्रतिसाद देत आहोत. शहरातील 17 प्रभागात आम्ही घरोघरी जाऊन जुन्या साडय़ांचे संकलन करणार असून पाच हजाराहून अधिक कापडी पिशव्या नागरिकाना देण्याचा संकल्प केला असल्याची प्रतिक्रिया संग्रामसिंग शिंदे व प्रकल्प प्रमुख राजेंद्र कटारिया यांनी लोकमतशी बोलताना नोंदवली.