शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्रा नक्षत्राची विचित्र अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा ...

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा पाऊस तर दुसरा शिवार कोरडा राहत असल्याने, पावसाने सीमावाद जोपासल्याची अनुभूती येत आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता खेडगाव शिवारात दहा-पंधरा मिनिटे वादळासह झालेला पाऊस शिंदी शिवारात नव्हता.

आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून याच एका टप्प्यात चार-पाच जोरदार पाऊस झालेत. अक्षरशः दहा-बारा दिवस पावसामुळे आंतरमशागत खोळबंली होती. मागील चार दिवसापासून उघडीप दिल्याने जरा कुठे वखरणी, कोळपणी व निंदणीचा वाफसा झाला होता. तोच पावसाने हजेरी लावली. पावसाची धार पडणे, वहाय पडणे असा शब्दप्रयोग शेतकरी यास संबोधतात. मागील आठवड्यात गिरणानदीच्या उत्तरेस खेडगाव-बात्सर भागात झालेला पाऊस गिरणानदीच्या दुसरीकडे कजगाव भाग कोरडा ठेवून गेला. जणू काही पावसासाठी गिरणानदी लक्ष्मणरेषाच ठरली. यामुळे एकाच तालुक्यात पाच-सहा किमीवर एकीकडे पिके तहानलीत तर दुसरीकडे आंतरमशागतीस योग्य वाफसा होत नसल्याची स्थिती आहे. क्षणात दाटून येणारे ढग, अचानक वादळ व त्याबरोबर दडदड कोसळणारा पाऊस निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव देत आहे.

फोटो कँप्शन :

खेडगावच्या शिवारात रविवारी झालेला पाऊस

पावसाअभावी एरंडोल तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर....

एरंडोल : तालुक्यात जवळपास आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे इवल्या-इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे.

पावसाअभावी पिके कोमजत आहेत. दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

एरंडोल तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात

मृगनक्षत्र हे मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात ज्वारी, मका, उडीद, मूग, कोरडवाहू कपाशी यांचा समावेश आहे. खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे. एरंडोल, कासोदा, तळई, उत्राण, रिंगणगाव, खर्ची, रवंजे, या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. उधार, उसनवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत असा प्रश्न सर्वसामान्य

शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष हे की रोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. रविवारी पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज मात्र पाऊस हुलकावणी देतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने खऱ्या अर्थाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.