शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

आदर्शनगरात मुक्काम करून चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: March 11, 2017 01:02 IST

मोलकरणीमुळे घरफोडी उघड : अत्यंत वर्दळीच्या व उच्चभ्रू वस्तीतील घटना; खाद्यपदार्थांवरही ताव

जळगाव : देवदर्शनासाठी मुंबईला गेलेल्या आदर्शनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी  शेख शब्बीर हुसेन ताहेर अली सैफी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी दोन दिवस मुक्काम करत मुद्देमाल लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी कामावर आलेल्या मोलकरणीमुळे उघडकीस आली आहे़ सैफी मुंबईला असल्याने नेमका लांबविलेला ऐवज कळू शकला नाही़ श्वान, ठसे तज्ञांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली़ विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील फ्रिजमधील खाद्यपदार्थांवर ताव मारत हात साफ केला़ शहरातील अत्यंत पॉश व वर्दळीच्या भागात चोरट्यांन ीधुमाकूळ घातल्यान ेआश्चर्य व्यक्त होत आहे.शब्बीर हुसेन ताहेर अली सैफी यांचा पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ मुलगी फरिदा हिचे लग्न झाले असून ती श्रीलंका येथे आहे़ तर मुलगा अली अजगर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो अमेरिकत  आहे़ सैफी हे पत्नीसमवेत आदर्श नगरातील सैफी विला या बंगल्यात दहा वर्षापासून वास्तव्यास आहेत़शेजारच्या नागरिकांनी कळविली घरफोडीची माहितीसैफी हे पत्नी समवेत दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे गेले होते़ यादरम्यान त्यांनी त्याच्याकडे घरकामाला असलेल्या मोलकरणीला बंगल्यात साफसफाई करण्याचे सांगितले होते़ त्यानुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बंगल्यावर कामासाठी आली़ साफसफाईला सुरवात करण्यापूर्वी तिला बंगल्याच्या मागील बाजूस असेल्या किचनला दरवाजा उघडा दिसला़ चोरीची शंका आल्याने पाहणी केली असता खात्री झाली़ तिने शेजारी रहिवाशांना प्रकार कळविला़ शेजारच्या नागरिकांनी सैफी यांना मोबाईलवरून प्रकार कळविला़ सैफी यांनी त्यांच्या कासमवाडी परिसरातील ईश्वर कॉलनी येथील पुतण्या मुस्तफा जफर यांना घटना कळविली़ त्यांनी तातडीने बंगला गाठला़ घरातील प्रत्येक खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला़ सहाय्यक पोलीस निरिक्षक अरविंद भोळे यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळाची पाहणी केली़ श्वान पथक तसेच ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ चोरटे सोडून गेले        कुदळ व पिशवीचोरटे कुदळ तसेच सोबत आणलेली पिशवी वाशिंगरूमध्ये सोडून गेले आहेत. चोरट्यांनी घरातील शौचालयाचा वापर केल्याचे दिसून आले आहे़ यावरून चोरट्यांनी दोन दिवस घरात मुक्काम केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे़ पोलिसांनी कुदळ तसेच पिशवी जप्त केली आहे़ कुदळीच्या सहाय्याने दरवाजा तोडलाचोरट्यांनी किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ किचन, दोन बेडरूम, दोन हॉल, वाशिंग रूम या सर्व खोल्यांमधील कपाटे, बॅग तसेच साहित्य अस्ताव्यस्त केला होता़ किचनमधील कपाटांमध्येही चोरट्यांनी शोधाशोध केली़ फ्रिजमधील खाद्यपदार्थावरही ताव मारला़ फ्रिजमधील कॅडबरी अर्धी खावून अर्धी तसेच पडली होती़ वाशिंगरूमचा कुदळीच्या सहाय्याने दरवाजा तोडला़ याठिकाणी तोडलेले कुलूप ठेवले होते़ याच ठिकाणावर चोरट्यांनी सोबत आणलेली पिशवी तसेच कुदळ पोलिसांनी हस्तगत केली आहे़