शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरी रोखणा:यांवर दगडफेक, अभियंता जखमी

By admin | Updated: May 6, 2017 00:47 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडीची घटना : पोलिसात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर : तालुक्यातील पातोंडी येथे वीजचोरी व आकडे टाकलेल्यांवर कारवाई करत असताना वीजचोरांकडून पथकावर दगडफेक करत अंतुर्लीच्या कनिष्ठ अभियंत्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली. रात्री उशिरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  महिनाभरापासून विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजचोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमले असून विविध ठिकाणी धाडी घालत दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जात आहे. 5 मे रोजी महावितरणचे पथक पातोंडी येथे कारवाईसाठी अचानक हजर झाले. पथकात अंतुर्लीचे कनिष्ठ अभियंता सचिन आठवले, शीतल तायडे, जमुना तडवी, मुकेश सनांसे, विजय केळकर, खलील तडवी, आशिष पाटील यांचा समावेश होता. या वेळी गावाच्या सुरुवातीच्या भागात मोठय़ा प्रमाणात तारांवर आकडे टाकल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई सुरू झाली .काही वेळातच जमाव जमून पथकाला शिव्या देत आरडाओरड करू लागले. या वेळी संतोष ज्ञानेश्वर शिरतुरे, पांडुरंग सुरेश वाघ, संदेश सुनील शंकपाळ, अजय गणेश वाघ, शुभम तुकाराम पानपाटील, राहुल अनिल शंकपाळ, सांडू सुरेश वाघ व कैलास रामदास शिरतुरे यांनी पथकावर दगडफेक करत चारचाकी क्र.(एमएच 19- एपी 5121) वर दगड तसेच लाथा मारून गाडीचे नुकसान केले. त्यानंतर अंतुर्लीचे कनिष्ठ अभियंता सुरेश हरिश्चंद्र आठवले यांना मारहाण करायला सुरुवात केले. प्रत्यक्षदर्शी व महिला  कर्मचा:यांच्या म्हणण्यानुसार मारहाण इतकी होती की त्यांना गावाच्या प्रथमदर्शनी भागातून अक्षरश: मारत गावाच्या मध्यभागार्पयत नेले. याप्रसंगी सरपंच यांनी त्यांना घरात घेतल्यानंतर पुढील अनर्थ टळला.  गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू असून पोलीस स्थानकात तालुक्यातील सर्व वीज कर्मचारी व काही अधिकारी जमा झाले होते. याप्रसंगी मुक्ताईनगरचे कनिष्ठ अभियंता यांनी सांगितले की आमचे कर्तव्य बजावत असताना आम्हालाच मारहाण होत असेल तर आम्ही काम तरी जसे करावे. पोलीस तपासात काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.