शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

दगडी दरवाजा आता पालिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 22:10 IST

शासनाचा निर्णय : दुरुस्ती करणार, वाहतुकीचा प्रश्नही सुटणार

अमळनेर : महाराष्ट्राच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने राज्य संरक्षित स्मारक दगडी दरवाजा अमळनेर नगरपालिकेस १० वर्षे दुरुस्ती व देखभालीसाठी देण्याचा विशेष शासन निर्णय घेतल्याने गेल्या चाळीस वर्षांपासूनची वाहतूक समस्या सुटणार आहे. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पुरातत्व विभागाकडे दरवाजा नगरपलिकेकडे हस्तांतर करण्याची मागणी केली होती आमदार अनिल पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला.दगडी दरवाज्याचा बुरुज कोसळल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दगडी दरवाजा पुरातत्व विभागाच्या राज्य स्मारक संरक्षित अंतर्गत असल्याने त्याला दुरुस्त अथवा पाडता येत नव्हता तथा त्याच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाला पावणे दोन कोटी रुपये लागणार होते तसा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र शासनाकडे निधी नसल्याने हे काम होत नव्हते. दिवसेंदिवस दरवाज्याची परिस्थिती खराब होत चालली असून तात्पुरत्या लावलेल्या गोण्या देखील कोसळू लागल्या आहेत. येणाऱ्या जाणाºया नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दगडी दरवाजा अमळनेर नगरपालिकेने ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेचा ठराव करून ठराव करून सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व पुरातत्व विभागाच्या संचालकांकडे जतन व दुरुस्तीची मागणी केली होती. आमदार अनिल पाटील यांनी या मागणीचा े पाठपुरावा सुरू करून अखेर पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजनेनंतर्गत अमळनेर दगडी दरवाजा (वेस) दहा वर्षाकरिता संगोपनार्थ अमळनेर नगरपालिकेस देण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्र. म. महाजन यांनी नुकताच हा शासन निर्णय जारी केला आहेयासंदर्भात नाशिक विभागाचे पुरातत्व विभागाच्या सहाययक संचालक आरती आळे यांच्या दालनात आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, कृष्णा बालपांडे, नपा अभियंता संजय पाटील हजर होते. एका करारनाम्याद्वारे हा दरवाजा अटी शर्ती पूर्तता करून नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या शासन निर्णयामुळे ४० वर्षाची वाहतुकीची समस्या सुटून नादुरुस्त दरवाजा दुरुस्त होऊन त्याच्या सुशोभीकरणात भर पडून पुरातन व ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारकाचे जतन करता येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांनी देखील या दरवाजाला तडे पडून तो कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे पुरातत्व विभागाला तो पडण्यापूर्वीच सूचित केले होते.शासनाने नागरपालिकेशी करार करण्यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांना प्राधिकृत केले असून सहाय्यक संचालक आरती आळे रविवारी दरवाज्याची पाहणी करण्यासाठी अमळनेर भेटीला येत आहेत.