शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन तास उशीराने सुरु झाली ‘पेट’ ची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 21:22 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून शनिवापासून पीएच.डी. पूर्व परीक्षेला जी.एच.रायसोनी इन्स्ट्यिूट मध्ये सुरुवात झाली. मात्र सकाळी ८.३० वाजेचा  सामान्य ज्ञानाचा पहिला पेपर सर्व्हर डाऊनमुळे तब्बल दोन तास उशीराने घेण्यात आला.

ठळक मुद्देसर्व्हर डाऊनमुळे अडचणी विद्यार्थ्यांचे हाल कुलगुरुंनी दिलीपरीक्षा केंद्राला भेट

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२३-उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाकडून शनिवापासून पीएच.डी. पूर्व परीक्षेला जी.एच.रायसोनी इन्स्ट्यिूट मध्ये सुरुवात झाली. मात्र सकाळी ८.३० वाजेचा  सामान्य ज्ञानाचा पहिला पेपर सर्व्हर डाऊनमुळे तब्बल दोन तास उशीराने घेण्यात आला. त्यामुळे दिवसभरात घेण्यात आलेल्या सर्व पेपरच्या वेळापत्रकावर याचा परिणाम झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. 

उमविकडून २३ ते २५ सप्टेंबर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. पहिल्या पेपरसाठी ८.३० ते सकाळी १०.३० ही वेळ निश्चित करण्यात  आली होती. परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा सभागृहात आले होते. मात्र सर्व्हरला अडचणी येत असल्याने तब्बल दोन तास उशीरा म्हणजेच सकाळी १०.३० वाजता परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या तीन पेपरच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला. रात्री ७.३० वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. पहिल्या दिवशी होणाºया पेपरसाठी १ हजार २०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र परीक्षेला ७९४ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर ४१३ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी परीक्षेच्या ठिकाणी पाहणी केली. रविवारी देखील सकाळी ८.३० वाजेपासून परीक्षा सुरु होणार आहे.