शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडण्यासाठी चोरल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील एका तरुणावर कर्ज असल्याने या कर्जाची फेड करण्यासाठी त्याने स्वत:चे ट्रॅक्टर घेऊन सोबत ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील एका तरुणावर कर्ज असल्याने या कर्जाची फेड करण्यासाठी त्याने स्वत:चे ट्रॅक्टर घेऊन सोबत आकाश व सागर या दोघांना नेत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली चोरण्याचा उद्योग सुरू केला होता. शिरसोली येथे जळके रस्त्यावरून चार महिन्यांपूर्वी या तिघांनी ट्रॉली चोरी करून तिचा चेचीस क्रमांक खोडला व रंग बदलवून विक्री केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील व अशोक पाटील यांच्या पथकाने आव्हाणे गाठून सागर व आकाश याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ट्रॉली चोरल्याची कबुली देत एका सहकाऱ्याचे नावही सांगितले. त्याला पैशाची गरज असल्याने त्याच्याच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शिरसोली येथून ट्रॉली लांबविल्याचे सांगितले, दरम्यान, त्याने ज्याला ही ट्रॉली विकली होती, त्याच्याकडून ती हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी ट्रॉली मिळण्याची शक्यता आहे. वडली, ता. जळगाव येथूनही काही महिन्यांपूर्वी प्रदीप प्रेमराज पाटील या शेतकऱ्याची ट्रॉली चोरीला गेली आहे. दरम्यान, अटकेतील दोघंही संशयित सराईत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिरसोली येथील चोरी गेलेली ट्रॅक्टर ट्राॅली सापडली आहे.

शिरसोलीतून आणखी २ ट्रॉली गेल्या होत्या चोरीला

शिरसोली येथील शेतकरी निजामुद्दीन पिंजारी यांची ट्रॉली सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेली आहे. ती आव्हाणे येथे रंग बदलून वापरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व त्यानंतर ही ट्रॉली सापडली. शिरसोली येथून अशाच प्रकारे तीन शेतकऱ्यांच्या घरासमोर लावलेल्या ट्रॉली अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविल्या होत्या. या ट्रॉलीदेखील सापडतील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.