शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शर्टावरील स्टीकर अन‌् रुमालावरील रक्ताच्या डागने केला खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:17 IST

जळगाव : खून झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या शर्टावर असलेले टेलरच्या स्टीकर व संशयितांच्या तोंडाला बांधलेल्या रुमालावर असलेल्या रक्ताचा डाग या ...

जळगाव : खून झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या शर्टावर असलेले टेलरच्या स्टीकर व संशयितांच्या तोंडाला बांधलेल्या रुमालावर असलेल्या रक्ताचा डाग या दोन बाबी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हेरल्या अन‌् तेथेच खुनाचा उलगडा होण्यासह मारेकरीही निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा जो प्रकार असतो, अगदी तसाच प्रकार या घटनेत समोर आला आहे. मयताची ओळख पटविण्यासह मारेकरी निष्पन्न करणे असे दुहेरी आव्हान पोलीस यंत्रणेने पेलले व त्यावर मात केली.

रावेर शहरात बऱ्हाणपूर रस्त्यावर २ फेब्रुवारी रोजी सकाळी ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत झालेला व्यक्ती शहरातील नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने त्याची ओळख पटविणे हेच सर्वात मोठे आव्हान पोलिसांसमोर होते, त्यानंतर मारेकरी शोधणे व खुनाचे कारण असे तिहेरी आव्हान पोलिसांसमोर होते. कारण जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा खून होऊन चार महिन्यांच्यावर कालावधी लोटलेला असताना त्यात ना मृताची ओळख पटली, ना मारेकरी शोधता आले. हेच चित्र डोळ्यासमोर ठेवून दोन दिवस झाल्यावरही मृताची ओळख पटत नसल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता त्यात मयताच्या शर्टावर न्यू रिलायन्स टेलर्स, पैठण रोड, औरंगाबाद असे स्टीकर आढळले. गवळी यांनी हाच धागा पकडून मयताचे शर्ट घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शीतल नाईक व हवालदार सुका तडवी या दोघांना तातडीने औरंगाबादला टेलरकडे रवाना केले.

शर्ट निघाला हॉटेल मॅनेजरचा

पोलीस टेलरकडे गेले असता त्यांना शर्ट दाखविले. त्या टेलरने वर्षभरात शिवलेल्या शर्टच्या पावत्या काढल्या असता त्या चिठ्ठीवर फक्त मोबाइल क्रमांक होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून संबंधितांशी संपर्क असता हा शर्ट औरंगाबादमधीलच एका हॉटेल मॅनेजरला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची भेट घेऊन चौकशी केल्यावर त्या मॅनेजरने हा शर्ट चुलत भावाला दिला होता व त्याचे नाव सौरभ गणेश राऊत (रा.गेवराई, जि.बीड) असे असल्याचे निष्पन्न झाले.