शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

फेरीवाल्यांमुळे गाळेधारक जेरीस

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

मंगळ बाजारासह अमृत चौक, सुभाष चौकासह इतर भागातील दुकानांसमोर बसणा:या फेरीवाल्यांनी दुकानदारांना जेरीस आणले आहे

नंदुरबार : मंगळ बाजारासह अमृत चौक, सुभाष चौकासह इतर भागातील दुकानांसमोर बसणा:या फेरीवाल्यांनी दुकानदारांना जेरीस आणले आहे. त्यामुळे व्यावसायही मंदावला आहे. काही जणांनी तर अशा जागा भाडय़ाने देण्याचा व्यवसायच सुरू केला आहे. त्यातील अनेक जण नगरसेवकांशी किंवा पालिकेशी संबंधित असल्यामुळे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे गाळेधारक व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.नंदुरबारात फेरीवाले व हातगाडीधारकांची समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावर साध्या दुचाकीनेही वाट काढणे म्हणजे मोठे दिव्य ठरते. त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेने एकदाचा निकाली काढावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. परंतु पालिका त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आली आहे. आता तर फेरीवाल्यांमुळे लाखो रुपये गुंतवणूक करून गाळे घेतलेल्या दुकानदारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नेहमीची भांडणे आणि वादविवाद वाढू लागले आहे. पालिकेकडे कुणा दुकानदाराने तक्रार केली तर उलट तक्रारदारालाच त्रास देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. समस्या कायमचीचशहरात फेरीवाल्यांची समस्या कायमची आहे. विशिष्ट जागा नसल्यामुळे हॉकर्स झोनदेखील पालिकेने जाहीर केलेला नाही. परिणामी फेरीवाले मन मानेल तेथे आपली लॉरी किंवा छत्री उभी करून आपला व्यवसाय करीत असतात. मुख्य बाजाराच्या परिसरात ही समस्या मोठय़ा प्रमाणावर आहे. बाजाराच्या दिवशी तर मंगळ बाजार, सुभाष चौक, अमृत चौक, झाडू बाजार या परिसरात चालणेही जिकिरीचे ठरते. इतर दिवशी अशा भागातून दुचाकी वाहन काढणे म्हणजे मोठे आव्हानात्मक असते. अनेक जण पालिकेच्या पावत्या फाडतात तर काही जण विना पावत्याच व्यवसाय करतात. यामुळे पालिकेचे उत्पन्न तर बुडतेच शिवाय व्यावसायिक आणि सर्वसामान्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.महिलांना त्रासया सर्व प्रकारामुळे महिलांनादेखील मोठय़ा प्रमाणावर त्रास होतो. बाजारात खरेदीसाठी येणा:या महिलांना अरुंद जागेतून जातांना धक्काबुकी सहन करावी लागते. काही वेळा छेडखानीचे प्रकारदेखील होतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.व्यावसायिक हैराणया परिसरात लाखो रुपये गुंतवणूक करून गाळे घेणा:या व्यावसायिकांना हैराण व्हावे लागत आहे. दुकानासमोर रस्त्यावर केवळ चार बाय पाचच्या जागेतच फेरीवाल्यांना बसता येते. परंतु अनेक फेरीवाले त्यापेक्षा अधिक जागा अडकवतात. काही जण लॉरी लावतात. लॉरीला जागा अधिक लागते. शिवाय जे पदार्थ विकले जातात ते पदार्थ लॉरीसह आजूबाजूलादेखील ठेवले जातात. परिणामी दुकानात जाण्यासाठी जागाच राहत नाही. हे पाहून गि:हाईक साहजिकच दुस:या दुकानाकडे वळतो. त्यामुळे संबंधितांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे.वादविवाद नेहमीचेचफेरीवाले व दुकानदार यांच्यातील वादविवाद आता मंगळ बाजार, अमृत चौक, सुभाष चौकात नित्याचाच झाला आहे. मोहनसिंग भैया मार्केटमधील दोन जणांचा याच कारणावरून वाद होऊन तीन ते चार वेळा हाणामारी झाली आहे. प्रकरण पोलिसात गेलेले आहे. असेच प्रकार इतर दुकानदारांबाबतदेखील घडत आहेत.बिल्ले द्यावेफेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी करून त्यांना पालिकेने बिल्ले देणे आवश्यक आहे. शिवाय ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेवर व्यवसाय थाटल्यास संबंधितांकडून दुप्पट दंड वसूल करावा. जेणेकरून मूळ गाळेधारकांना त्रास होणार नाही, तसेच बाजारात येणा:या महिलांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षणदेखील केलेले आहे. परंतु पुढे काहीही हालचाल झालेली नाही. रस्त्यावर बसून व्यवसाय करणा:यांचे अजबच फंडे समोर येत आहेत. पालिकेत पावती कुणाच्या नावावर फाडली जाते, प्रत्यक्षात दुसराच त्या ठिकाणी व्यवसाय करीत असतो. याचा अर्थ जागा भाडय़ाने देण्याचादेखील व्यवसाय काही मंडळी करीत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक जण नगरसेवक किंवा सत्ताधारी गटाशी संबंधित आहेत. कुणी गाळेधारक तक्रार करण्यास पालिकेत गेला तर त्याचे काहीही ऐकूण घेतले जात नाही. परिणामी गाळेधारक कमालीचे हैराण झाले आहेत.पालिकेने या बाबीवर तोडगा काढून शहरात हॉकर्स झोन जाहीर करावे. त्या भागात सर्व फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. शिवाय पालिकेच्या नियमानुसारच गाळेधारकांच्या समोर अर्थात रस्त्याच्या कडेला फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.