शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सोशल मीडियापासून दूर रहा, जीवनाचा अर्थ सापडेल - यशपाल शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:11 IST

तरुणाईला सल्ला : मनापासून काम करा, कोणत्याही क्षेत्रात हमखास यश

ठळक मुद्देसकारात्मक परिस्थिती आपल्याला तयार करावी लागतेचांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदानआभासी जगात तरुणाई भरकटतेय

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 10 - आपण जे काम करतो त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून द्या. जे करू ते मनापासून करू असा निश्चय करा, मग बघा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असा यशाचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते यशपाल शर्मा यांनी तरुणाईला दिला. या सोबतच जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर काही काळ मोबाईल, सोशल मीडिया या भ्रमीक जगाला बाजूला सारा, मग तुम्हाला जीवनाचा अर्थ सापडेल, असाही सल्ला त्यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यावतीने यशपाल शर्मा यांचा तरुणाईशी संवाद साधण्यासाठी ‘यूथ मीट’ या कार्यक्रमाचे गुरुवारी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. आदिवासी बांधवांसाठी लढणा:या नंदुरबार जिल्ह्यातील ङिालाबाई यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. अभिनेत्री तथा दिग्दर्शिका प्रतिभा शर्मा, क्लबचे अध्यक्ष अॅड. सूरज जहाँगिर, उपाध्यक्ष गनी मेनन, सचिव कृष्णकुमार वाणी, ङिालाबाई, जननायक फाउंडेशनचे होनाजी चव्हाण उपस्थित होते. 

आभासी जगात तरुणाई भरकटतेयतरुणाईशी गप्पा मारताना सर्व प्रथम यशपाल शर्मा यांनी आजची तरुणाई भरटली असल्याचे सांगून त्यांना यातून सावरण्याचे आवाहन केले. काही काळ मोबाईलला दूर सारा व जेथे नेटवर्क नाही तेथे जाऊन बघा, तेथे मनाला किती शांती मिळेल. आज जगासोबत चालले पाहिजे, असेही ते म्हणाले, मात्र या अभासी जगाच्या आहारी न जाता जे कर्म कराल, ते पूर्ण मनापासून करा, तुम्ही हमखास यशस्वी व्हाल, असेही त्यांनी नमूद केले. 

चांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदानअभासी जगातून बाहेर पडून तुम्ही चांगल्या साहित्याचे वाचन करा. चांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदान असल्याचे सांगून मराठीतील शिवाजी सावंत, वसंत देव, विजय तेंडुलकर या लेखकांचा त्यांनी आवजरून उल्लेख केला. यांच्यासह इतरही लेखकांचे साहित्य तुम्ही वाचल्यास विचार प्रगल्भ होतील व तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. 

सकारात्मक परिस्थिती आपल्याला तयार करावी लागतेकोठेही गेला तर तेथे तुम्हाला तुमच्या दृष्टीने, तुमच्या कामाच्या दृष्टीने सकारात्मक परिस्थिती मिळत नाही तर ती आपल्याला तयार करावी लागते, असा यशाचा मंत्र त्यांनी तरुणाईला दिला. 

खलनायकाची भूमिका सर्वात चांगली म्हणताच टाळ्य़ाचा कडकडाटएरव्ही चित्रपटातील नायकाची भूमिका सर्वाना आवडते. मात्र माङया दृष्टीने खलनायकाची भूमिका सर्वात चांगली आहे. कारण संपूर्ण चित्रपटात तो नायकाला त्रास देत असतो व आनंद घेत असतो. त्यामुळे हीच भूमिका मला जास्त आवडते, असे उत्तर भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला यशपाल यांनी दिले. त्यांच्या या उत्तरावर संपूर्ण सभागृहात टाळ्य़ांचा कडकडाट झाला. तुम्ही एकदम चांगले, नम्र वागून चालणार नाही, थोडे खोडकर असायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले. रंगमंच हेच खरे साधनेचे ठिकाणचित्रपट व नाटक यांच्यातील तुलनेबाबत बोलताना यशपाल म्हणाले, नाटकातूनच खरी भूमिका साकारली जाते. त्यामुळे रंगमंच हेच खरे साधनेचे ठिकाण आहे.  

‘वो कल भी चुना लगाते थे और आज भी चुना लगा रहे है..’आपल्या गप्पांचा शेवट यशपाल यांनी काही काव्य ओळींनी केला. यामध्ये त्यांनी नेत्यांच्या भूमिकेवरील कविता मांडताना सांगितले की, एका नेत्याची हकालपट्टी होऊन तो पान टपरी चालवू लागला. त्यावर पत्नी म्हणते, बघा एका नेत्याचे हाल ते पान टपरी चालवित आहे. त्यावर पतीने उत्तर दिले, ‘वो कल भी चुना लगाते थे और आज भी चुना लगा रहे है..’, या ओळींनी सभागृहात जोरदार हशा पिकला. आयुष्यात अविस्मरणीय क्षणङिालाबाई यांच्यावर लघुपट तयार करणा:या, यशपाल शर्मा यांच्या पत्नी प्रतिभा शर्मा यांनी सांगितले की, मी जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील असून प्रतिभा शिंदे या माङया चांगल्या मैत्रीण आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी हा विषय घेतला व या लघुपटासाठी मला पाच वर्षे लागली. यातील प्रत्येक क्षण मला चांगला वाटतो. ङिालाबाई व माङो काही जुने नाते असावे, त्यामुळे आमच्यात खूप चांगला संवाद आहे.  हा विषय माङया आयुष्यातील अविस्मरणीय विषय असल्याचे त्यांनी सांगितले.