पारोळा शहराच्या विविध विकासकामांना २५ लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर असून नगराध्यक्ष करण पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे ही शहराच्या सौंदर्यात व नावलौकिकात भर टाकणारी आहे, असेही खासदार उन्मेष पाटील म्हणाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तथा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते खासदार उन्मेष पाटील होते. यावेळी चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, भाजप युवानेते कपिल पाटील, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, गटनेते बापू महाजन, नगरसेवक पी. जी. पाटील, नवल चौधरी, सुधाकर पाटील, कैलास चौधरी, संजय पाटील, डी. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शौचालय व स्वच्छतागृह, बगिचा रस्ते, अग्निशमन कार्यालय व निवासस्थाने या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण, शहरातील दिव्यांग बांधवांना निधीवाटप, घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थींना धनादेश वाटप, नगरसेवक पी. जी. पाटील, वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान व सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ५६ दात्यांनी रक्त्तदान केले. यावेळी नगराध्यक्ष करण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, किसान महाविद्यालयासमोर हरित पट्टा वृक्षलागवड करण्यात आली.
फोटो