जळगाव : नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, बांभोरी यांच्यातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जाहीर झालेले नोबेल विज्ञान पुरस्कारांचे वितरण रविवारी सकाळी १० वाजता आयएमआर महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
याप्रसंगी या वर्षाचे पुरस्कारांचे मानकरी शिक्षक गटातील भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक भानुदास जोगी, मालेगाव येथील ल.रा. काबरा विद्यालयाचे विज्ञान शिक्षक महेश बागड, तर सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या शिक्षिका ऊर्मिला नाचण यांना डॉ. सी.व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शाळा गटात कराड येथील सरस्वती विद्यालय, बारामती येथील शारदाबाई विद्यानिकेतन तसेच जळगाव येथील ब.गो. शानबाग विद्यालय यांना विज्ञान प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नॅनो संशोधक डॉ. एल. ए. पाटील, माजी प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर, तहसीलदार नामदेव पाटील, डॉ. अनिल लोहार, डॉ. संजय शेखावत, एन. टी. पाटील उपस्थित राहणार आहेत.