शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

शेतकऱ्यांविषयी राज्य सरकारचा बेगडी कळवळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

जळगाव : एकीकडे शेतकऱ्यांसाठी घोषणा करीत स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणारे राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करीत ...

जळगाव : एकीकडे शेतकऱ्यांसाठी घोषणा करीत स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणारे राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करीत असल्याने राज्य सरकारचा शेतकऱ्यांविषयीचा हा बेगडी कळवळा आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवारी केला.

महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. याद्वारे जनतेला अंधारात टाकण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने सुरू असल्याचा आरोप करीत महावितरणच्या निषेधार्थ शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी भाजपच्या वतीने महावितरण केंद्रांवर ‘टाळा ठोको व हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये जळगावातही आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी आमदार भोळे यांनी राज्य सरकारवर वरील आरोप केला.

योजनांची घोषणा, मात्र वीजपुरवठा खंडित

राज्य सरकारला वेळीच जाग आली पाहिजे, यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांविषयी हे सरकार कळवळा दाखवीत असले तरी आघाडीत बिघाडी झालेले हे सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करीत आहे. आमच्या सरकारच्या काळात एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा आम्ही खंडित केला नाही, असा दावाही या वेळी आमदार भोळे यांनी केला.

कार्यालयाला ठोकले टाळे

महावितरणच्या कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधातील तसेच वीज बिल माफ झालेच पाहिजे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी सरकारच्या निषेधाचे फलकही झळकविण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाला आंदोलकांनी टाळे ठोकले.

मुख्य प्रवेशद्वाराला कडीकोयंडा नसल्याने प्रवेशद्वार खुले

महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वाराला फाटक आहे. मात्र त्याला कडीकोयंडा नसल्याने आंदोलकांनी आतमध्ये जात कार्यालयाच्या दरवाजाला टाळे लावले.

आकडे टाकणाऱ्यांचा त्रास इतरांना का?

या वेळी महावितरणच्या कारभारावरही आमदार भोळे यांनी टीका केली. यात ज्या भागात आकडे टाकले जातात तेथे जे ग्राहक वीज भरतात त्यांनाही खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार भोळे म्हणाले. इतरांच्या चुकांचा त्रास बिल भरणाऱ्यांनी का सहन करावा, असा सवाल या वेळी करण्यात आला.

या आंदोलनावेळी आमदार भोळे यांच्यासह जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक भगत बालाणी, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सरिता नेरकर, रेखा कुलकर्णी, पार्वताबाई भिल, डॉ. राधेश्याम चौधरी, जितेंद्र मराठे, विकी सोनार, रेखा वर्मा, प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.