शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 00:18 IST

कोरोनाची चाचणी, मृतांचा आकड्याबाबत लपवाछपवी जळगाव : राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आपले अपयश लपवण्यासाठी ...

कोरोनाची चाचणी, मृतांचा आकड्याबाबत लपवाछपवी

जळगाव : राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आपले अपयश लपवण्यासाठी कोरोनाची चाचणी, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी सुरू आहे. इतका वाईट प्रसंग जनतेवर आला असून ज्या गांभीर्याने हा प्रसंग घ्यायला हवा, त्या पद्धतीने राज्य शासन गांभीर्याने घेत नाहीये, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली.

जिल्ह्यातील कोरोना उपाय योजना व इतर विषयासंदर्भात गिरीश महाजन व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

अहवालाला विलंबशासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाहीये. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केला. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल १२ ते १४ दिवस येत नाहीत. हे सारे चित्र गंभीर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात खूप मोठी आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन अजूनही शासनाने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चौकशी होऊच द्या 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. कोरोनाच्या संकटात मदत करण्याऐवजी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. या विषयावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही. एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने थेट गृहमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत, ही घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली आहे. न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी होत आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या म्हणण्याला अर्थ नाही. या प्रकरणात दिलासा मिळावा म्हणून सत्ताधारी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात गेले. पण त्यांना दिलासा मिळाला नाही. आता एकदा या प्रकरणाची चौकशी होऊन जाऊ द्यावी, भाजप काय म्हणते, याला अर्थ नाही. या प्रकरणाची चौकशी होणे अपरिहार्य आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.