शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वकील उमेदवारासाठी प्रदेशाध्यक्षांची वकिली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:05 IST

के.सी. पाडवी यांना काँग्रेसची उमेदवारी : पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याची कसरत

ठळक मुद्दे३७ वर्षात प्रथमच बदलला उमेदवार

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातून अखेर काँग्रेसने आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत घेवून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान काँग्रेसच्या एका नाराज गटाच्या मनधरणीसाठी मात्र पक्षनेत्यांना मोठा प्रयत्न करावा लागणार आहे.३७ वर्षात प्रथमच बदलला उमेदवारनंदुरबार लोकसभा मतदार संघात गेल्या ३७ वर्षात (साडेतीन दशकात) प्रथमच यंदा काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची पक्षावर वेळ आली. ज्येष्ठ नेते व माजी खासदार माणिकराव गावीत हे सलग नऊ वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. निवडून येणारा उमेदवार व प्रचंड जनसंपर्क हे त्यांचे गुण पक्षासाठी फायद्याचे ठरल्याने आतापर्यंत पक्षाला उमेदवार बदलण्याची गरज भासली नाही. गेल्यावेळी मात्र ते प्रथमच पराभूत झाले. शिवाय सध्या वयोमानाने ते थकल्याने नवीन उमेदवाराचा या वेळी शोध सुरू झाला होता.अन् संभ्रम मिटला...नवीन उमेदवारासाठी दोन महिन्यापूर्वीच महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीने आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांच्या नावाची शिफारस केली होती. सुरूवातीला के.सी. पाडवी यांचेच नाव पक्षाने पुढे केले होते. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर भरत गावीत यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याने तेही स्पर्धेत आले होते. अशा स्थितीत पक्षातर्फे कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत उत्सुकता लागून होती. अखेर मंगळवारी रात्री पक्षाने अधिकृतपणे नंदुरबार लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे अ‍ॅड.के.सी. पाडवी यांचे नाव जाहीर केल्याने संभ्रम मिटला आहे.विद्यार्थी चळवळीतून राजकारणातआदिवासी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीतून त्यांचे नेतृत्त्व उदयास आले. सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही काँग्रेस पक्षात त्यांना दुसऱ्या फळीतच स्थान होते. आता लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी मतदार संघातही संपर्क वाढविला होता. विशेषत: ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल, आमदार सुरूपसिंग नाईक, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला व पक्षश्रेष्ठींकडे त्यांची शिफारस केली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील त्यांना हिरवा कंदील दिला होता. उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळी त्यांचे प्रमुख स्पर्धक म्हणून माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांचे नाव पुढे आले होते. परंतु अ‍ॅड.वळवी यांनी देखील मुलाखतीच्या वेळी के.सी. पाडवी यांना समर्थन दिले. त्यामुळे पाडवी यांचा मार्ग तेव्हाच सुकर झाला होता.गावित आक्रमक झाल्याने झाला होता पेचपरंतु शेवटच्या टप्प्यात भरत गावीत हे उमेदवारीसाठी आक्रमक झाल्याने पेच निर्माण झाला होता. कारण भरत गावीत व त्यांचे पिता माणिकराव गावीत तसेच नवापूरचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे अर्थातच दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींकडे वजन असल्याने उमेदवारीबाबत स्पर्धा वाढली होती.अशा स्थितीत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अ‍ॅड.के.सी. पाडवी यांचे नाव पुढे केले आहे. पाडवी यांना उमेदवारी मिळाल्याने अर्थातच भरत गावीत यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे. या नाराज कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी काँग्रेसनेत्यांना प्रयत्न करावा लागणार आहे.सलग सहा वेळा आमदारअ‍ॅड.के.सी. पाडवी हे धडगाव-अक्राणी मतदार संघातून सलग सहा वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ व २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली आहे. १९९० मध्ये ते जनता दलाकडून, १९९५ मध्ये अपक्ष म्हणून विजयी झाले. तर १९९९ पासून ते काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले.

टॅग्स :Politicsराजकारण