शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएमए’च्या राज्यस्तरीय परिषदेला जळगावात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 12:39 IST

वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन

ठळक मुद्देसकाळी डॉक्टरांसाठी मार्गदर्शन सत्रवैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 5 - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘अॅम्सकॉन 2017’ या अॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे 5 ऑगस्ट रोजी जळगावात आयोजन करण्यात आले आहे. सकाळी डॉक्टरांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्रात वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपचार पद्धती, नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात आले. 5  व 6 ऑगस्ट रोजी जळगावात हॉटेल कमल पॅराडाईज येथे आयोजित या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी  सकाळी 9 वाजता  या परिषदेला सुरुवात झाली. या वेळी आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, कोषाध्यक्ष डॉ. पार्थिव संघवी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वेश अग्रवाल, सचिव डॉ. राजेश पाटील, सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. राज नगरकर, डॉ. एन.एस. आर्वीकर यांच्यासह राज्यभरातील  डॉक्टर उपस्थित होते. या वेळी मेंदू व ह्रदय विकारावरील उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दुपारी 4 वाजता  आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्याहस्ते   उदघाटन सोहळा होणार आहे.या  परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित राहणार आहे.  या परिषदेच्या आयोजनाचा बहुमान प्रथमच जळगाव आयएमएला मिळाला असल्याचे सचिव डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.  या परिषदेला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.