शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग बोगदा कामास प्रारंभ

By admin | Updated: February 28, 2017 00:08 IST

जळगाव : बजरंग बोगद्याच्या कामास अखेर रेल्वेच्या मक्तेदाराकडून प्रारंभ झाला आहे.

जळगाव : बजरंग बोगद्याच्या कामास अखेर रेल्वेच्या मक्तेदाराकडून प्रारंभ झाला आहे. त्यात या नवीन बोगदे उभारायच्या परिसरातील ६० मीटर पर्यंतच्या जागेचे जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्याचे काम सोमवारी सुरू झाले. दोन दिवस हे काम चालणार असून त्यानंतर या ठिकाणी श्ोड उभारून मक्तेदाराचे आॅफीस बनवून शेजारी बोगद्यासाठीचे काँक्रीटचे ब्लॉक तयार करण्यात येणार आहेत.पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्यानजीक २ बोगदे तयार करण्यासाठी मंगळवार, दि.१४ फेब्रुवारी रोजी  अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत शुभारंभ करण्यात आला. बुधवारपासून या ठिकाणी अडथळा असणारे वृक्ष तोडण्यास प्रारंभ झाला. मात्र बोगद्याच्या प्रत्यक्ष कामास मक्तेदाराने प्रारंभ केलेला नव्हता. त्याची सुरूवात सोमवार, २७ फेब्रुवारीपासून झाली आहे.  ९ महिन्यांची मुदत मक्तेदाराला देण्यात आली असली तरी ५ महिन्यात दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण करण्याचा मक्तेदाराचा प्रयत्न राहणार आहे. ६० मीटर परिसरात सपाटीकरणरेल्वे रुळाखाली बजरंग बोगद्याजवळच दोन बोगदे तयार करण्यात येणार आहे. लांबी ४ मीटर व उंची २.४० मीटर असेल.  ‘पुश थ्रु’ पध्दतीने हे काम होईल. नवसाचा गणपती मंदिरापासून तर एस.एम.आय.टी. महाविद्यालयाकडे हा रस्ता जोडला जाणार आहे. या कामासाठी आवश्यक असलेले काँक्रीटचे ब्लॉक या ठिकाणीच तयार केले जाणार आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष बोगद्याच्या ठिकाणापासून ६० मीटरच्या परिसराचे सपाटीकरण जेसीबीमार्फत करण्यात येत आहे. शेड, आॅफीसही उभारणारदोन दिवसात सपाटीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी जेसीबी व २० कामगार सध्या हे काम करीत आहेत. त्यानंतर या परिसरात शेड उभारून मक्तेदाराचे आॅफीसही         या ठिकाणी सुरू करण्यात येणार  आहे. १ लाख नागरिकांचा प्रश्न मार्गी लागेलशहरातील रेल्वेमार्गावर असलेला बजरंग बोगदा  प्रेम नगर, एसएआयटी कॉलेज, मुक्ताईनगर, पिंप्राळा व महामार्गाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण आहे. मात्र तो अरुंद असल्याने व तेथून  सांडपाणी व पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असते. तसेच पिंप्राळा रेल्वेगेट देखील अनेकदा बंद असते. यामुळे या ठिकाणी देखील वाहतुकीचा खोळंबा होत असतो. मात्र नवीन बोगदे तयार होत असल्याने ही समस्या आता मार्गी लागणार आहे. या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी दूर होणार असून पिंप्राळा परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.