शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

अचानक तपासणी : मूळ कागदपत्र २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्‍याच्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बोगस शिक्षक भरतीप्रकरणी ...

अचानक तपासणी : मूळ कागदपत्र २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्‍याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बोगस शिक्षक भरतीप्रकरणी मान्यतेच्या प्रस्तावांची नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण कार्यालयात अचानक जाऊन तपासणी केली. यावेळी अनेक शिक्षकांच्या मूळ संचिका उपलब्ध नसताना त्यांचे पगार सुरू आहेत, त्यांची पडताळणी करण्यासाठी या मूळसंचिका उपलब्ध करण्याचे निर्देश संचालकांनी दिले होते, मात्र ते अद्याप तयार न केल्याने शिक्षण विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यासह चौकशीसाठीचे सर्व आवश्यक कागदपत्रे २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती उपसंचालक नितीन उपासनी 'लोकमत'ला दिली.

विधान परिषदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील काही संस्थांमधील नोकरभरती विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकाराच्या चौकशीला सुरुवात झाली होती. तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या काळात मान्यता देण्यात आल्या होत्या. यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्‍याच्या सूचना केल्या होत्या. वारंवार सांगून सुद्धा कागदपत्र उपलब्ध होत नव्हती. अखेर आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी मंगळवारी उपासनी यांनी जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला अचानक भेट दिली.

मूळसंचिकाच तयार केलेल्या नाहीत....

शिक्षण विभागातून शिक्षकांच्या मूळसंचिका उपलब्ध होत नाहीत, ऑर्डर नाहीत, शालार्थ आयडी नाहीत, मात्र पगार बिले निघत आहेत, त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या कार्यकाळातील शिक्षकांच्या मान्यतांविषयी चौकशी सुरू आहे. या विभागात भोंगळ कारभार सुरू असून, मूळसंचिकाच तयार केलेल्या नाहीत. यामुळे असे किती शिक्षक आहेत, हे मूळसंचिका तयार झाल्यावर निदर्शनास येणार आहे. यासाठी त्या तयार करण्याच्या सूचना या आधीच देण्यात आल्या होत्या. मात्र यावर कोणतेही काम न झाल्याने या विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. तसेच आवश्यक मूळ कागदपत्र २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

वेतन पथकाचीही तपासणी

शिक्षकांच्या वेतन पथकाचीही तपासणी केली. या ठिकाणीही घोळ आहे. पे युनिटमधील बिलांची तपासणी करण्यासह किती बिले पेंडिंग आहेत, किती शाळांचे पगार झाले, किती बाकी याचा आढावा घेतला असून, पगाराचा निधी उपलब्ध झाल्यावर तत्काळ वेतन ट्रान्सफर अदा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे नितीन उपासनी यांनी सांगितले. तपासणीवेळी नितीन उपासनी यांच्यासोबत माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उच्चमाध्यमिक लेखाधिकारी मनिष कदम, उपनिरीक्षक दिनेश देवरे आदींची उपस्थिती होती.