शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे बसस्थानकात विनयभंग करणा-या एस़टी़ मेकॅनिकची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:11 IST

सहकारी महिला कर्मचा-याशी गैर वर्तन

ठळक मुद्दे शिवसेना महिलां पदाधिका-यांनी दिला चोपपोलिसांनी घेतले ताब्यात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- आगारातील यांत्रिक विभागातील भुसावळ येथील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचा:याचा विनयभंग करणा:या आदील अहमद शेख रा़ जळगाव या एस़टी़ वर्कशॉपमधील मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानक गाठून यथेच्छ धुलाई केली़ अध्र्यातासार्पयत त्याला बदडत महिलांनी संताप व्यक्त केला़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आह़ेपिडीत प्रशिक्षणार्थी महिला परिवारासह भुसावळ येथे वास्तव्यास आह़े 22 रोजी त्यांची जळगाव आगारात मॅकेनिक म्हणून नियुक्ती झाली असून तेथील यांत्रिक विभागात प्रशिक्षण सुरु आह़े 25 रोजी पिडीत महिला नेहमीप्रमाणे जळगाव आगारात प्रशिक्षणासाठी आली होती़  याच विभागात आदिल अहमद शेख हा कार्यरत आह़े त्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्टार्टर वायर कशी लावायची हे सांगत पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल़ेकाका म्हटल्यावरही चाळेपीडितेच्या खांद्यावर हात ठेवत जवळीक साधण्याचा प्रय} करताच तिने शेखला ‘काका असे करु नका’ असे सांगत विरोध केला असता, शेख याने  तिला ‘मी तुझा काका दिसतो का?’ असे म्हणत पुन्हा  चिमटी काढत अश्लिल चाळे करण्याचा प्रय} केला. महिलेने तीव्र विरोध करताच ‘तुला राग येतो का ते बघत होतो’ असे  म्हणत  पळ काढला.पीडित दोन दिवसांपासून तणावातशेख याने केलेल्या अश्लिल कृत्याच्या प्रकारानंतर पीडित महिला तणावात होती़ दोन दिवस तिने जेवणही केली नाही़ मात्र शिवसेनेच्या महिलांनी शेख यास चोप दिल्यावर तिला धीर आला़ यावेळी पिडीतेनेही शेखला चपलांनी मारहाण करत प्रचंड संताप व्यक्त केला़ बसस्थानकात आगारातील कर्मचा:याला महिला बदडत असल्याची माहिती शहरात वा:यासारखी पसरली़ पोलीस आले, मात्र बसस्थानकातील कुणीही अधिकारी तेथे आले नाही़ यानंतर शिवसेनेच्या पदाधिका:यांसह महिलांनी स्थानकप्रमुख, आगार व्यवस्थापक तसेच विभाग नियंत्रक खिरवाडकर यांचे कार्यालय गाठले. मात्र एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता़  त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला असता, कोणत्याच अधिका:याने फोनही उचलला नसल्याचे, मोहन तिवारी यांनी सांगितल़ेआगार व्यवस्थापकांनी केले शेखचे निलंबनविनयभंगाच्या प्रकारानंतर भेदरलेल्या पिडीतीने रडत-रडत डेपो कार्यालयाचे वर्कशॉप पर्यवेक्षक निलेश बेंडकुळे यांच्याकडे आदिल शेख विरोधात लेखी तक्रार दिली होती़ तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली़  दुस:या दिवशी मंगळवारी व बुधवाही ही कर्मचारी कामावरच होता़ कुठलीही कारवाई न झाल्याने तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिका:यांनी दखल घेतल्याने पोलीस ठाण्यात शेख विरोधात फिर्याद दिली़ शेख ला बदडल्याच्या घटनेनंतर आगार व्यवस्थापक प्र™ोश बोरसे यांनी शेखला निलंबित केल़ेपिडीतेसह महिलांनी कपडे फाटेर्पयत बदडले.. या घृणास्पद प्रकाराची माहिती मिळताच बुधवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या शोभा चौधरी, छाया पाटील, रंजना अत्तरदे, ज्योती शिवदे तसेच मोहन तिवारी, गजानन मालपुरे यांनी नवीन बसस्थानक गाठल़े बस स्थानकाच्या आवारात शेखला बोलाविल़े तो दिसताच पिडीतेसह चारही महिलांनी त्याला लाथा, बुक्के, चापटा तसेच चपलांनी बेदम चोप दिला़ यानंतर त्याला पुन्हा बसस्थानकातील कार्यालयात नेत त्याठिकाणी पुन्हा यथेच्छ धुलाई केली़ अर्धातास हा गोंधळ सुरूच होता. महिलांच्या रुद्रावतारामुळे बसस्थानकात बघ्यांची एकच गर्दी झाली होती़ पोलिसांनी घेतले ताब्यातमहिला एकास मारहाण करत असल्याची मिळाल्यावर जिल्हापेठचे गुन्हे शोध विभागातील रवी नरवाडे, प्रविण भोसले यांनी बसस्थानक गाठल़े व शेखला मारहाण करणा:या महिलांच्या तावडीतून सुटका करीत पोलीस ठाण्यात आणल़े पिडितेसह शिवसेनेच्या पदाधिका:यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठल़े व आदिल शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला़ शेख याला अटक करुन पोलिसांनी न्यायालयात हजर केल़े न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला़ंसोमवारी पीडितेने लेखी तक्रार केली होती़ या तक्रारीनुसार वर्कशॉपच्या यांत्रिक विभागातील कर्मचारी आदिल शेख याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आह़े तसेच प्रकाराचा अहवाल तयार करुन विभागीय कार्यालयाला पाठविला होता़ महिला तक्रार निवारण समितीकडून चौकशीपूर्ण होईर्पयत शेखला निलंबित केले असून चौकशीनंतर समितीच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल -प्र™ोश बोरसे, आगार व्यवस्थापक