शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर, शिंदखेडा व सुरतसाठी एसटीच्या जादा बसेस

By admin | Updated: May 26, 2017 12:31 IST

रेल्वे रद्द झाल्याने हाल : रावेर, चोपडा, यावल येथून वाढीव बसफे:या

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26 -  पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणामुळे काही पॅसेंजर रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. या पाश्र्वभूमीवर एसटी महामंडळानेही सुरत, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा या भागात बस फे:या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 
रावेर येथून नवीन बससेवा सुरु
रावेर येथून सुरत येथे बुधवारी सायंकाळीच नवीन बससेवा सुरू झाली. तर चोपडा, यावल येथूनही  शिंदखेडासाठी बस सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहिती एसटीच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवडकर यांनी दिली. 
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील युवक, नागरिक गुजरातमध्ये नोकरीनिमित्त स्थिरावले आहेत. सुरत, बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर्पयत प्रवासी जातात. त्यासाठी रेल्वे हीच एकमेव सुकर प्रवास व्यवस्था असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वेने जाण्यासाठी होते. पण सुरत भुसावळ पॅसेंजर (येणारी व जाणारी) फास्ट सुरत भुसावळ पॅसेंजर फक्त नंदुरबार ते भुसावळ दरम्यान धावणार आहे. तर इतर पॅसेंजर व अमरावती फास्ट पॅसेंजरही रद्द झाली आहे. तसेच इतर एक्सप्रेस गाडय़ांचे थांबे बदलले आहेत. 
11 जूनर्पयत या रेल्वे गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पण प्रवाशांना ये जा करण्यासाठी शेवटी एसटी बसचा मोठा आधार आहे. सुरतर्पयत जाणा:या बसची संख्या कमी आहे. गुजरातमधील परिवहन मंडळातर्फे एसटी बसना तेथील आगारात किंवा बसस्थानकात उभे राहण्यासाठी जागा दिली जात नाही. त्यामुळे सुरत येथे एसटी बस पाठविण्यासंबंधी एसटी महामंडळातर्फे गुजरातमधील परिवहन विभागाशी चर्चा केली जाणार आहे. 
 
ज्या बस आगारात एसटी बसची मागणी येईल, त्या बस आगारातून संबंधित ठिकाणी बस सोडली जाईल. यावल, चोपडा येथून शिंदखेडा, दोंडाईचार्पयत बस सोडल्या जात आहेत. तसेच इतर आगारांमधूनही बडोदा, सुरत येथे बस सोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
-चेतना खिरवडकर,  विभाग नियंत्रक, जळगाव