शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.बसचा तो चालक तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 12:09 IST

बस अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक

जळगाव : बेजबाबदारपणे बस चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला एस.टी.चा बसचालक देविदास सुका कोळी याला प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.सावखेडा बु. येथील घनश्याम पाटील व तापीराम पाटील हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ ५ मार्च रोजी कामानिमित्त दुचाकीने घराकडे जात असताना भोकरकडून जळगावकडे येणारी एस.टी. महामंडळाच्या (क्र एमएच २० बी. सी. २४१४) या बसच्या टपावर ठेवलेले टायर जमिनीवर कोसळ््यानंतर थेट दुचाकीस्वारांच्या अंगावर गेले.या अपघातात टायरचा मार लागल्याने, घनश्याम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता तर तापीराम पाटील हे देखील गंभीर जखमी झाले होते.या अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या आदेशाने विभागीय वाहतुक अधिकारी प्रल्हाद घुले यांनी अपघाताला जबाबदार धरुन निलंबीत केले आहे.बस अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनकबसच्या टपावर ठेवलेले टायर कोसळून गंभीर जखमी झालेले तापीराम माधवराव पाटील (३६) यांची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती वैद्यकिय सूत्रांनी दिली. या अपघातात घनश्याम उमाकांत पाटील (३७) हे जागीच ठार झाले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता करंज व सावखेडा गावादरम्यान ही घटना घडली होती. बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून बस पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, बसचालक देविदास सुका कोळी याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.मयत पाटील यांच्या परिवारला मदतीसाठी प्रयत्नमयत घनश्याम पाटील यांना महामंडळाकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अपघात प्रकरणी चौकशी सुुरु आहे. महामंडळातर्फे घनश्याम पाटील यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून, देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.