शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा-भडगावच्या सीमेवर बिबट्या चटावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:43 IST

खेडगाव, ता. भडगाव , जि.जळगाव : सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाºया रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या ...

ठळक मुद्देतिसऱ्या गोºह्याचा फडशापेंडगाव, शिवरे व तामसवाडी परिसरात नागरिक भयभितवनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाºया रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या गोºह्यावर बिबट्याने हल्ला चढवत फडशा पाडला. यामुळे पारोळा-भडगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवरील वनास लागून असलेल्या पेंडगाव, शिवरे, तामसवाडी, पथराड, रताळे आदी गावांतील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरे, कॅमेरे आदी लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे यांचा गेल्या काही दिवसांत या भागात उपद्रव वाढला आहे.२८ रोजी पेंडगावी, दि.१ रोजी तामसवाडी, ता.पारोळा व पुन्हा दि.४ च्या रात्री असे तीन दिवस मिळून या मादी बिबट्याने तीन गोºह्यांचा फडशा पाडला. वनविभागाने हे पंचनामे केले असले तरी पंचनाम्यावरच त्यांचे अडले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कारण बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असतानाच वनविभागाकडृन त्यास पकडण्यासाठी ंिपंजरे, कॅमेरे लावणे आदी काही एक उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथे संताप व्यक्त होत आहे.या जंगलास लागून भडगाव तालुक्यातील पेंडगाव, पथराड,जुवार्डी,आडळसे तर पारोळा तालुक्यातील शिवरे,तामसवाडी,रताळे आदी गावे येतात. जंगल असल्याने या गावांमधून पशुपालनाचा व्यवसाय वाढला आहे. यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट-तिप्पट जनावरांची संख्या येथे आहे. ही जनावरे शेतात-रानात उघड्यावरच बांधलेली असतात. बिबट्याचा वावर वाढल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. आधीच दुष्काळ, त्यातच मादी बिबट्याचे हल्ले सुरुच असल्याने जनावरांविषयीची चिंता लागली आहे. आज जनावरांच्या रक्ताची चटक लागलेला बिबट्या उद्या रात्री-बेरात्री शेतावर जाणाºया शेतकºयांच्या जीवावर उठणार नाही हे कशावरुन,अशी भीती व्यक्त होत आहे.जनावरे उघड्यावर बांधू नयेसदर बिबट्याची मादी बहाळ, ता.चाळीसगाव भागातून आली आहे. वनात पाणी नसल्याने त्या शोधात गावांच्या दिशेने आल्यानंतर शेतात उघड्यावर बांधलेल्या गुरांवर ती हल्ला करीत आहे. शेतकºयांनी गुरे सुरक्षित जागी बांधावीत. एक-दोन दिवसात कॅमेरे लावण्यात येतील. पिंजरा आदी उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतींचा तसा ठराव आल्यास वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल.- कविता पाटील, वनरक्षक

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारBhadgaon भडगाव