शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

चिरंतन आणि सर्वोच्च आनंद देणारा विषय म्हणजे अध्यात्मशास्त्र.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

जळगाव : आपल्याला सर्वोच्च सुख मिळावे, असे सूक्ष्मातीसूक्ष्म प्राण्यापासून सर्वांत प्रगत अशा मनुष्य प्राण्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी त्याची ...

जळगाव : आपल्याला सर्वोच्च सुख मिळावे, असे सूक्ष्मातीसूक्ष्म प्राण्यापासून सर्वांत प्रगत अशा मनुष्य प्राण्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी त्याची क्षणोक्षणी धडपड चालू असते. चिरंतन सर्वोच्च सुख (यालाच आनंद म्हणतात.) कसे प्राप्त करून घ्यायचे, हे शिकवणारे शास्त्र, म्हणजे अध्यात्मशास्त्र.

सर्वज्ञता देणारा विषय - विश्‍वात अनंत विषय असल्याने सर्वांचा अभ्यास करून सर्व विषयांत नैपुण्य मिळवणे जन्मोजन्मी अभ्यास केला, तरी शक्य नाही. सर्वज्ञ अशा ईश्‍वराशी एकरूप व्हावयाचे असेल, तर सर्वज्ञता असायलाच हवी. त्यासाठी परमेश्‍वराने अध्यात्म या विषयाची सोय केली आहे. अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, त्यात सर्वज्ञता आली की, सर्व विषयांत सर्वज्ञता येते. याचे कारण म्हणजे अध्यात्मापासूनच सर्व विषयांची निर्मिती आहे.

जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची संधी - मनुष्याचा जन्म दोन कारणांसाठी पुनःपुन्हा होतो. पहिले ६५ टक्के कारण म्हणजे प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि दुसरे ३५ टक्के कारण म्हणजे आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अध्यात्मिक उन्नती करून घेणे. ही दोन्ही कारणे अध्यात्माशी संबंधित आहेत.

सकाम आणि निष्काम साधनेसाठी उपयुक्‍त - संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे ’ याचा अनुभव बहुतेकांना असतो. सर्वसाधारणपणे मानवी जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते. आनंद कसा मिळवायचा, हे ठाऊक नसल्याने प्रत्येक जण पंचज्ञानद्रीये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे थोडा वेळ तरी सुख मिळावे, यासाठी प्रयत्‍न करतो, उदा. आवडती वस्तू खाणे; तसेच दुःख टाळण्याचाही प्रयत्‍न करतो, उदा. रुग्ण असल्यास औषध घेणे, दूरचित्रवाणी संच बिघडला, तर व्यवस्थित करून घेणे इत्यादी. थोडक्यात सांगायचे, तर पुढील दोन प्रकारच्या रोगांत अध्यात्मिक स्तरावरील उपाय (उदा. नामजप) महत्त्वाचे असतात.

- सदगुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था, जळगाव