शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST

(मातृदिन विशेष) संत राजिंदर सिंहजी महाराज : जळगाव : दरवर्षी इंग्रजी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (मदर्स-डे) हा ...

(मातृदिन विशेष)

संत राजिंदर सिंहजी महाराज :

जळगाव : दरवर्षी इंग्रजी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (मदर्स-डे) हा दिवस जगभरात मातांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आई आणि मुलाचे नाते हेच केवळ एकमेव असे प्रेम आहे, जे पवित्र व नि:स्वार्थ आहे. आपण आपल्या जीवनातील उदाहरण घेतले असता, आपल्याला कळून येते की, संसारिक प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वोत्तम आदर्श म्हणजे आई आणि मुलातील प्रेम आहे. आपण बघतो की, अगदी लहान मूल कसे आपल्या आईचे केस ओढते आणि तिच्या गालावर चापट मारते. तरीही त्याच्या अशा कृतीचा आईला राग येत नाही. जर मल-मूत्राने माखलेले मूल तिच्याकडे आले, तर प्रथम ती त्याला स्वच्छ करते, कपडे परिधान करते आणि मिठी मारते. आईचे मुलाप्रतीचे प्रेम म्हणजे एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचणारा मार्ग होय. आई आणि मुलाच्या नात्यामध्ये लोभाला कोणतेही स्थान नाही. आई आपल्या मुलासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत असते. स्वतःच्या घासातील घास काढून ती आपल्या बाळाला भरविते.

त्याचप्रमाणे, बाळाला उब मिळावी म्हणून ती स्वतःचे वस्त्र त्याच्या भोवती लपेटते. आपल्या मुलासाठी करीत असलेल्या तिच्या त्यागाला आणि बलिदानाला अंत नाही. या पवित्र नात्यात, आई मुलाच्या प्रेमाशिवाय, या जगातील इतर नातेसंबंधातील प्रेम सोडून देते. जेव्हा मूल तिच्या कुशीत असते तेव्हा ती सर्वकाही विसरून जाते व केवळ आपल्या मुलाच्या प्रेमात मग्न राहते. या नात्यात, आई स्वतःला विसरते व आपल्या मुलाच्या इच्छापूर्तीकरिता स्वतःच्या इच्छांचादेखील त्याग नि:स्वार्थपणे करते.

जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपल्या आईसाठी काय करावे, हे सुनिश्चित केले पाहिजे. आपण आईचा मान राखून तिच्यावर प्रेम करून असे करू शकतो. आपल्यासाठी तिने प्रेमाने केलेल्या सर्व गोष्टी व प्रयत्नांचा अंत:करणापासून स्वीकार करायला हवा.

असे म्हटले जाते की, संत- सद्गुरूंचे आपल्या शिष्यावरचे प्रेम हे हजारो मातांच्या प्रेमापेक्षाही मोठे असते. सर्वशक्तिमान पिता-परमेश्वर आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतो. संत-सद्गुरू आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाहीत, ते तर केवळ आपल्याला देण्यासाठीच येतात. ते नेहमीच आपल्याला अंतःकरणात जाऊन परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी प्रेरित करतात.

आपण मातृदिनी वचन देऊ या, प्रतिज्ञा करू या, की आईच्या नि:स्वार्थ प्रेमाचे स्मरण फक्त मातृदिनी न करता, आपल्या हृदयात त्या प्रेमाला सदैव वृद्धिंगत करू या. आपल्या हृदयात त्या प्रेमाला सदैव जपू या, त्याची कदर करू या. पिता-परमेश्वराचेदेखील आपण आभार मानू या, की त्याने आपल्याला मानवी जीवनाची एक सुवर्ण संधी दिली आहे. अगणित आशीर्वादांसाठी आणि अनंत प्रेमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण आपले जीवन प्रेमाने, सदाचाराने जगावे. ध्यान- धारणेला वेळ देऊन, आध्यात्मिक मार्गावर वेगाने प्रगती करावी.

संकलन : ज्योती विजय