शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

यावल-जळगाव तालुक्याच्या सीमेवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 17:41 IST

जळगाव-यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदी पात्रातील गेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी उच्च तंत्र प्रणाली यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सुमारे ४०० मजुरांचा ताफा कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात वाहने दिमतीला आहेत. गुरुवारी सायंकाळी आमदार हभिाऊ जावळे यांनी धरणावर भेट देवून प्रकल्प सल्लागार पी.आर.पाटील व मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांच्याकडून आढावा घेतला.

ठळक मुद्देउच्च तंत्राचा वापरयेत्या पावसाळयात धरणात ५० टक्के साठा असेलआमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतला आढावा

यावल, जि.जळगाव : जळगाव-यावल तालुक्याच्या सीमेवरील तापी नदी पात्रातील गेल्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी उच्च तंत्र प्रणाली यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सुमारे ४०० मजुरांचा ताफा कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात वाहने दिमतीला आहेत. गुरुवारी सायंकाळी आमदार हभिाऊ जावळे यांनी धरणावर भेट देवून प्रकल्प सल्लागार पी.आर.पाटील व मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रशांत मोरे यांच्याकडून आढावा घेतला. याप्रसंगी तहसीलदार कुंदन हिरे, बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, विलास चौधरी, उज्जैनसींग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील उपस्थित होते.आमदार हरिभाऊ जावळे यांनी शेळगाव बॅरेज प्रकल्पास भेट देवून आढावा घेतला. सन २०१२ पुराने धरणाचे बांधकाम तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने व बांधकामात बदल केल्यानंतर झालेले बांधकाम फोडावे यासाठी अनुभवी अभियंत्यांनी सुचविलेल्या डायमंड वायर रोप या उच्च तंत्रज्ञानाने बांधकाम सुरू आहे. बांधकाम कापण्यासाठी अत्यंत उच्च व महागडे तंत्रज्ञान असल्याचे प्रकल्प सल्लागार प्रकाश पाटील व कायकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.आमदार जावळे यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना अडचणींची विचारणा केली व निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. आहे.या प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या पाच-सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगून येत्या पावसायात धरण ४०-५० टक्के भरले जाणार असल्याची ग्वाही अधिकारी वर्गाने पत्रकारांना दिली.बुडीत क्षेत्राचा पूलकडगाव-जोगलखेडा हा वाघूर नदीवरील पूल, पिळोदा-भुसावळ रस्त्यावरील मोर नदीवरील पूल आणि अंजाळे घाट ते अंजाळे गाव १९५ मीटर लांबीचा पूल या तीन पुलांच्या निविदा काढलेल्या आहेत. या पुलांच्या बांधकामास लवकरच सुरवात होणार आहे. धरणाच्या खालच्या बाजूस असलेला प्रस्तावित जळगाव- शेळगाव-बामणोद राज्यमार्गावर या पुलासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे. हा पूल झाल्यास यावल-जळगाव अंतर केवळ २२ किलोमीटर होणार आहे. बुडीत क्षेत्रातील पुलांच्या कामानुसार धरणातील जलसाठा वाढवला जाणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाने दिली.सन १९९९ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली होती. तेव्हा १९८.५ कोटींच्या प्रकल्प होता. मात्र २०१२ पासून काम बंद होते. वर्षापासून आमदार जावळे यांच्या प्रयत्नाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत तगादा लावून सुधारित किमतीनुसार ६९९ कोटी ४८ लाख खर्चासाठी शासनाने मान्यता दिली असल्याने कामास गती मिळाली. धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या मार्गदर्शन भिंतीचे बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे.असा आहे प्रकल्पप्रकल्पासाठी एक हजार ८४८ हेक्टर क्षेत्राची गरज आहे. त्यात खासगी ११६० हेक्टरपैकी ६६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. शासकीय जमीन ६४८ हेक्टर, तर वनजमीन ४० हेक्टर लागत असून, पूर्ण जमीन संपादित करण्याची प्रक्रिया झाली आहे. बॅरेजची साठवण क्षमता ११६.३६६ दशलक्ष घनमीटर (४.११ टीएमसी) राहणार आहे. प्रकल्पामुळे तापी काठावरील मच्छिमारी व्यवसायात मोठी वाढ होार आहे.सिंचनाचा लाभया प्रकल्पामुळे यावल तालुक्यातील १९ गावे प्रत्यक्ष लाभ क्षेत्रात येत असून, ९ हजार १२८ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तालुक्यातील कोणतेही गाव बुडीतात जाणार नाही. तालुक्यातील आठ गावे तर भुसावळ चार गावे व जळगाव तालुक्यातील तीन गावातील शेतकºयांची जमीन प्रकल्पात जाणार आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल