शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यात खरीप हंगाम पेरणीपूर्व कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

सध्या ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका यासह पिकांची अंतिम काढणीही तालुक्यात रानोमाळ दिसत आहे. पीक काढणीचा व खरीप ...

सध्या ज्वारी, बाजरी, भुईमूग, मका यासह पिकांची अंतिम काढणीही तालुक्यात रानोमाळ दिसत आहे. पीक काढणीचा व खरीप हंगाम पेरणीपूर्व शेती मशागतींच्या कामांची शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकरी ट्रॅक्टर वा बैलजोडीने शेत नांगरणे, वखरणे, कपाशीसाठी, ऊस, केळी पीक लागवडीसाठी सऱ्या पाडणे, शेतात खत पसरवणे, शेतावरील बांध, काडीकचरा जाळणे यासह शेतीकामांना वेग आला आहे. या आठवड्यापासून तालुक्यात मान्सूनपूर्व बागायती कापूस लागवडीस सुरुवात झाली आहे. कापूस लागवडीलाही वेग आला आहे.

बागायती कापूस लागवडीसह शेती मशागतीच्या कामांना चांगलाच वेग वाढला आहे. तालुक्यात आता शेतशिवार शेतकरी, शेतमजुरांच्या धावपळीने गजबजल्याचे चित्र आहे. ७५ ते ८० मिलीमीटर पाऊस पडल्यावरच ओलाव्यातच शेतकऱ्यांनी पीक पेरण्या कराव्यात जेणेकरून उगवण क्षमता चांगली राहील. नुकसान टाळता येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे व कृषी अधिकारी दीपक निकुंभ यांनी केले आहे.

भडगाव तालुक्यात होणार ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या

भौगोलिक क्षेत्र ४८ हजार ४४६ हेक्टर

लागवडलायक क्षेत्र ४२ हजार १३१ हेक्टर

मागील वर्षी झालेल्या पीक पेरण्या ३७ हजार ६९३ हेक्टर

यावर्षीचे उद्दिष्ट ३७ हजार ६९३ हेक्टर

कापूस लागवड

मागील वर्षी-२५ हजार २६० हेक्टर

यावर्षी-२७ हजार हेक्टर.

सोयाबीन

मागील वर्षी- ६१० हेक्टर.

यावर्षी- ७५० हेक्टर.

भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापन

बी-बियाणे, कीटकनाशक, रासायनिक खते खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून भडगाव पंचायत समितीत कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे. हा कक्ष कार्यान्वितही करण्यात आला आहे. भरारी पथकही याकामी नेमण्यात आले आहे. जादा दराने बियाणे व रासायनिक खतांची विक्री होत असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे, कृषी अधिकारी दीपक निकुंभ यांनी केले आहे.

===Photopath===

010621\01jal_2_01062021_12.jpg

===Caption===

गोंडगाव शिवारात बैलजोडीने शेती मशागतीचे काम करणारा शेतकरी.