पारोळा, जि.जळगाव : पालिकेच्या विषय समित्या निवडीसाठी सदस्य नामनिर्देशन करण्यासाठी पालिकेच्या सभागृहात बुधवारी विशेष सभा घेण्यात आली.तहसीलदार अनिल गावंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगराध्यक्ष करण पवार, उपनगराध्यक्ष सुनीता प्रकाश वाणी, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, वित्त नियोजन, महिला बालकल्याण आदी विषय समित्यांवर प्रत्येकी पाच-पाच सदस्यांचे नामनिर्देशन करावयाचे होते.विषय समित्यांवर सदस्य नामनिर्देशन करण्यासाठी शहर विकास आघाडीकडून नेतृत्व गटनेत्या वंदना गोविंद शिरोळे, भाजपकडून गटनेते बापू तुकाराम महाजन तर शिवसेनेकडून गटनेते दीपक पंढरीनाथ अनुष्ठान यांनी केले.विशेष सभेला भाजपचे दोन, शहर विकास आघाडीचा एक, शिवसेनेचे दोन व एक स्वीकृत असे सहा सदस्य गैरहजर होते.यावेळी तहसीलदार अनिल गावंदे यांनी गट नेत्यांनी नामनिर्देशन केलेल्या सदस्यांची नावे वाचून कायम केले. मुख्याधिकारी मुंडे यांनी आभार मानले.
पारोळा पालिकेची विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 16:39 IST
पारोळा , जि.जळगाव : पालिकेच्या विषय समित्या निवडीसाठी सदस्य नामनिर्देशन करण्यासाठी पालिकेच्या सभागृहात बुधवारी विशेष सभा घेण्यात आली. तहसीलदार ...
पारोळा पालिकेची विशेष सभा
ठळक मुद्देविषय समित्यांसाठी नामनिर्देशन दाखलप्रत्येकी पाच-पाच सदस्यांचे नामनिर्देशन