शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

रेल्वेगाडी येताच पुलाखालची वाहतूक होते ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : जळगाव शहरातून ममुराबाद-विदगावकडे जाणारा रस्ता रेल्वेच्या पुलाखालून जातो. पुलावरून एखादी प्रवासी रेल्वे गाडी जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : जळगाव शहरातून ममुराबाद-विदगावकडे जाणारा रस्ता रेल्वेच्या पुलाखालून जातो. पुलावरून एखादी प्रवासी रेल्वे गाडी जात असताना पुन्हाखालील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबत असल्याचा प्रसंग दिवसभरात अनेकवेळा घडतो. धावत्या रेल्वेच्या शौचालयामधील मलमूत्र अंगावर पडण्याचा किळसवाणा प्रकार टाळण्यासाठी दुचाकी व चारचाकीचालक पुलाच्या दुतर्फा थांबत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.

लोहमार्ग फाटकमुक्त करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाकडून बऱ्याच ठिकाणी लहान व मोठे उड्डाण तसेच भूमिगत पुलांचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात खर्चही केला जात आहे. सुदैवाने जळगावहून ममुराबाद- विदगावमार्गे यावल तसेच चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर आधीच रेल्वे पुलाची सोय आहे. काळाची गरज ओळखून जळगाव ते भुसावळदरम्यान टाकण्यात येत असलेल्या चौथ्या लोहमार्गासाठी सदर पुलाचा अलीकडेच विस्तार झाला आहे. त्यासाठी बऱ्याच ठिकाणी नवीन मोठे गर्डरदेखील टाकण्यात आले आहेत. मात्र, ब्रिटिशकाळापासून अस्तित्वात असलेले लोखंडी गर्डर बदलण्यात आले नाहीत. याच गर्डरमधून रेल्वेच्या शौचालयामधील मलमूत्र थेट पुलाच्या खाली पडत असल्याचे दिसून येते. रेल्वेगाडी काहीवेळा सिग्नल न मिळाल्याने नेमकी पुलावर येऊन थांबते तेव्हा मोठा बाका प्रसंग उद्‌भवतो. पुलाखालून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना रेल्वे जात नाही तोपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. पूल असतानाही फाटक बंद झाल्यागत परिस्थिती दररोज निर्माण होत असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेकवेळा वाहतूक कोंडीचा प्रकार घडतो. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने एकतर लोखंडी गर्डर बदलण्याची कार्यवाही करावी किंवा गर्डरखाली पत्रा बसवावा, अशी मागणी परिसरातील वाहनधारकांनी केली आहे.

--------------------

फोटो कॅप्शन - जळगाव- ममुराबाद रस्त्यावरील रेल्वेपुलाखाली दररोज अशाप्रकारे फाटक नसतानाही वाहने थांबताना दिसून येतात. (जितेंद्र पाटील)