शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

‘कापूस वेचाले चाल वं सोनी’ गाण्याने लावले अनेकांना वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 18:11 IST

मजुरांच्या वाढत्या टंचाईने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसत असतानाच " कापूस वेचाले चाल वं सोनी " हे खान्देशी लोकगीत ग्रामीण भागात मोठ्या हौसेने ऐकले जात आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या वाढत्या टंचाईने शेतकरी हैराण.खान्देशी लोकगीत ग्रामीण भागात मोठ्या हौसेने ऐकले जातेय.

 लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर, जि. जळगाव : शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीची लगबग असून मजुरांच्या वाढत्या टंचाईने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसत असतानाच " कापूस वेचाले चाल वं सोनी " हे खान्देशी लोकगीत ग्रामीण भागात मोठ्या हौसेने ऐकले जात आहे. या गीताच्या माध्यमातून वाकी, ता.जामनेर येथील  अण्णा सुरवाडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा केलेला प्रयत्न परिणामकारक ठरत आहे.कापूस वेचाले चाल व सोनी हे गीत सध्या यु ट्यूबवर धूम करीत आहे. शांताराम साळुंके हे गीतकार असून अण्णा सुरवाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पोलीस सेवेत कार्यरत असलेले केकतनिंभोरे, ता. जामनेर येथील प्रकाश जोहरे यांनी संगीताची साथ दिल्याने गीताचा गोडवा वाढला आहे. जामनेर येथील मिलिंद लोखंडे यांच्या जी. एम. म्युझिक स्टुडिओमध्ये मनोज दुसाने यांनी गाण्याचे रेकोर्डिंग केले. संकल्पना नीलकंठ पाटील यांची असून कुणाल थेटे व योगेश बाविस्कर यांच्या कुशल दिग्दर्शनाची जोड लाभली आहे. जी.एम चॅनेलचे मिलिंद लोखंडे यांच्या प्रयत्नातून गीताला मोठा प्रतिसाद मिळाला.

या कलावंताचा सहभागसोनाली बेहेरे (सोनी), रजनी साळुंके, भीमा शिंदे, गोविंद मोरे, उमेश मोरे यांच्यासह पिंपळकोठा ग्रामस्थांनी भूमिका साकारल्या आहेत. सनलाईट फिल्मचे नीलेश सपकाळे यांचे छायाचित्रण व मनोज दुसाने यांचे व्हिडीओ एडिटिंग गाण्याची परिणामकारकता वाढवते.

टॅग्स :musicसंगीतagricultureशेतीcottonकापूस