शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथील भाजप नगरसेवकासह पुत्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:53 IST

शेतातून पकडले : राष्ट्रपुरुषाची प्रतिमेची विटंबना व पाटील कुटुंबावर हल्ला प्रकरण

चाळीसगाव - राष्ट्रपुरुषाची प्रतिमा असलेल्या बॅनरची विटंबना केली व अर्जुनसिंग पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करून मारहाण प्रकरणी भाजपचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी व त्यांचा मुलगा राहुल राजेंद्र चौधरी या दोघांना गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास बहाळ शिवारातील मक्क्याच्या शेतातून पोलिसांच्या पथकाने अटक केली.चाळीसगाव शहरातील देवकर मळ्यात नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांच्या मालकीचे जागेवर अपार्टमेंटचे बांधकाम सुरू होते. याठिकाणी मजुरांसाठी केलेल्या मुतारीला राष्ट्रपुरुषाची प्रतिमा असलेले बॅनर लावून चौधरी यांनी विटंबनेचा प्रकार केला.याबाबतची विचारणा अर्जुनसिंग पाटील यांनी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचेकडे केली असता उलट त्यांनाच चौधरी यांनी काठीने मारहाण केली. यावेळी अर्जुनसिंगची आई मिनाबाई व भाऊ करणसिंग हे भांडण सोडवण्यासाठी आले असता राजेंद्र चौधरी यांचे भाऊ व मुलांनी पाटील कुटुंबावर तलवारीने हल्ला केला म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला राजेंद्र चौधरी यांच्यासह सहा जणांविरोधात भादवी कलम गुन्हां दाखल करण्यात आला आहे.यानंतर चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना राजेंद्र चौधरी हे बहाळ शिवारात लपलेले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मयुर भामरे, पोहेकॉ बापूराव भोसले, पोना गणेश पाटील, पंढरीनाथ पवार, नितीन पाटील, भटू पाटील, राहुल गुंजाळ, संदिप पाटील, भूषण पाटील, संदिप पाटील यांच्या पथकाने राजेंद्र चौधरी व त्यांचा मुलगा राहुल चौधरी यांना बहाळ शिवारातील मक्याच्या शेतातून गुरुवारी रात्री २ वा. अटक केली. याप्रकरणातील आणखी चार जण फरार असून त्यांचाही शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले.दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीनगरसेवक राजेंद्र चौधरी व त्यांचा मुलगा राहुल चौधरी या दोघांना १४ रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.