शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार प्रवाशांसाठी दोन स्वतंत्र बोगी जाेडून प्रवासाची समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

जळगाव : रेल्वेने दररोज अप-डाउन करणार्‍या नोकरदार प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दोन स्वतंत्र बोगी जोडून त्यांची प्रवासाची समस्या सोडवावी, अशी ...

जळगाव : रेल्वेने दररोज अप-डाउन करणार्‍या नोकरदार प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दोन स्वतंत्र बोगी जोडून त्यांची प्रवासाची समस्या सोडवावी, अशी मागणी मध्य रेल्वे उपभोगकर्ता परामर्श समितीचे सदस्य चंद्रकांत (संदीप) कासार यांनी केली आहे.

समिती सदस्यांची बैठक नुकतीच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक गुप्ता यांच्यासोबत झाली. प्रवाशांच्या विविध समस्यांवर, मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. चंद्रकांत (संदीप) कासार यांनी अप-डाउन करणार्‍या प्रवाशांसाठी एक्स्प्रेस व मेल गाड्यांना स्वतंत्र दोन बोगी लावण्यात याव्यात, अशी मागणी केली. या प्रवाशांना जनरल बोगीत जागा मिळत नाही, आरक्षित बोगीत प्रवास केल्यास दंड होण्याची भीती असते. त्यामुळे या प्रवाशांनी जायचे कुठे, प्रवास कसा करायचा ? असा प्रश्‍नही कासार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारी उधना-पाळधी मेमू ही गाडी भुसावळपर्यंत वाढवावी. सद्य:स्थितीत अनेक प्रवाशांना पाळधीला उतरून जळगाव, भुसावळपर्यंत ऑटोरिक्षा व बसने प्रवास करावा लागतो. या गाडीचा मार्ग वाढविल्यास या प्रवाशांची समस्या सुटून रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल याकडेही चंद्रकांत ( संदीप) कासार यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.