शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांचे गाव फुल गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:58 IST

स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

ठळक मुद्देसैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवरसैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी सांभाळला कार्यभार १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग

सुधीर पाटीलवरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात गावातील स्वातंत्र्य सैनिकांनीही सहभाग घेत देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढण्याचे प्रेरणास्थान सानेगुरुजींकडून मिळाले. तेव्हापासून देशसेवेचे व्रत उचलत आजही देशरक्षणार्थ तरुणांचा कल आहे.स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावातील राममंदिरात साने गुरुजीनी इंग्रजाच्या लक्षात न येता देश स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना सहभागी करून घेत ब्रिटिशांच्या विरोधात फळी उभारली. त्यात त्रंबक झेंडू पाटील, अमृत पाटील (दिवानजी) त्र्यंबक पंडू पाटील, नारायण आवसू चौधरी, भालचंद्र नारायण पाटील, नथ्थू तोताराम चौधरी अशी एक स्वातंत्र्य सैनिकांची फळी उभी राहिली. ब्रिटिश शासनाच्या विरोधात कारवाया करताना त्यांना अमळनेर येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली.त्यानंतर कालांतराने १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याकरिता तरूणांचा ओढा असल्याने येथील तरुण गावाच्या लोकसंखेच्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. सैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी कार्यभार सांभाळला आहे.कॅप्टन रामदास चौधरी यांनी सन १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर वासुदेव सोमा महाजन यांनी सन १९७१ च्या युध्दासह श्रीलंकेत शांती सेनेत सहभाग नोंदवला. तसेच हरी नारायण कोलते यांनी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.माजी सैनिकांचे मार्गदर्शनसैन्य दलातून निवृत्तीनंतर या माजी सैनिकांनी तरूणांना सतत मार्गदर्शन केल्याने तरूणांचा कल देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची वाढल्याने भारतीय सैन्यदलात गावातील तरुणांची संख्याही वाढली.ऐतिहासीक वास्तूसन १८११ साली उभारण्यात आलेली राममंदिराची वास्तू १० वर्षांनंतर आजही स्वातंत्र्य लढ्याची साक्षीदार म्हणून डौलाने उभी आहे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनBhusawalभुसावळ