शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून ‘सोशल सर्व्हीस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:43 IST

स्तुत्य: व्हॉट्सअप ग्रुपने फुलविले दोन घटस्फोटीतांचे जीवन

चोपडा : सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सध्या माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या गैरवापरातून तरुण भरकटत चालले आहेत. यामुळे समाजात समाजात अंधश्रद्धा, जातीयता, भेद, अश्लीलता पसरवली जात आहे, असे आपण सदैव ऐकत असतो. पण याच सोशल मीडियाच्या चांगल्या वापरामुळे समाजसेचा स्तुत्य उपक्रम चोपडा तालुक्यात घडला आहे.जळगाव जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक बी.एन.पाटील जानवेकर (ह.मु.चोपडा) यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन समाजसेवेसाठी वाहून घेण्याचे ठरविले. सेवानिवृत्तीनंतर आपल्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा समाजातील गरजूंना व्हावा या उद्देशाने त्यांनी व्हॉट्सअपवर पुनर्विवाह व्हाट्सअ‍ॅप ग्रुप, घटस्फोटीत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, खान्देशी विवाहोत्सुक व्हॉट्सअप ग्रुप आदी ग्रुप बनवून समाजातील गरजू , विवाहोत्सुक व घटस्फोटीत तरुण-तरुणींना एकत्र आणून त्यांच्या एकाकी जीवनाला जीवनसाथी मिळवून देऊन त्यांचे जीवन पुना बहरविण्याचे कार्य सुरू केले.या कार्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जळगाव येथील किरण संतोष पाटील व कल्याण येथील शुभांगी शिंदे यांचा पुनर्विवाह या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाटील यांनी घडवून आणला. किरण पाटील यांना दोन मुली असून त्या उच्च शिक्षण घेत आहेत व त्यांच्या पत्नी पाच वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्या आहेत. त्या मुलींना आई मिळवून देण्यासाठी तसेच किरण व शुभांगी यांच्या जीवनात परस्परांना आधारस्तंभ मिळवून देण्यासाठी या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाटील यांनी पुढाकार घेतला. दोन्हीकडच्या कुटुंबीयांना समजावले. एकत्र आणले. समुपदेशन केले. आणि याचाच परिपाक म्हणून या दोघांचा विवाह नुकताच एरंडोल तालुक्यातील पद्मालय या ठिकाणी गणपती मंदिरात साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी वधू, वराकडील कुटुंबीय व उपस्थितांनी या व्हाट्सअप ग्रुपचे व अ‍ॅडमिन भास्करराव नाना पाटील यांचे आभार मानले. याआधीही या ग्रुपच्या माध्यमातून अनेक विवाह पार पडले आहेत. समाजात उत्तम आदर्श घालून देणाऱ्या या ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.