शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुनखेडा पुलाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:04 IST

सहा वर्षांपासूनचा प्रश्न : विधीमंडळात मंजुरीला कोरोनाचा गतिरोधक

रावेर : गत सहा ते सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीत आलेल्या महापुरात भोकर नदीवरील रावेर - मुक्ताईनगर मार्गावरील पूल वाहून गेला होता. तद्नंतर या पुलाला अनेकदा डागडुजी करत नवीन पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत गत सहा- सात वर्षांपासून मंत्रालयात या पुलावरून अनेकदा ‘पुराचे पाणी’ वाहून गेल्याची शोकांतिका असून भिजत घोंगडे पडल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.विशेषत: मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे व तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी आगामी विधीमंडळ अधिवेशनात या पुलाच्या सुमारे सहा कोटीच्या अंदाजपत्रकाला तत्वत: मान्यता मिळवली असली तरी कोरोनाचा गतिरोधक बाजूला सारून या प्रस्तावाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.गत सहा ते सात वर्षांपूर्वी भोकर नदीला अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात रावेर - मुक्ताईनगर मार्गाचा हा पूल खचून वाहून गेल्याने सदर रस्त्यावरील वाहतूक थोपवण्यात आली आहे.पावसाळ्याखेरीज नदीपात्र कोरडेठाक असताना पुलाला पर्याय म्हणून नदीपात्रातून रहदारी सुरू असते.जि.प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आला. मात्र, सदर पुलाच्या गंभीर दैनावस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.तत्कालीन व विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे या पुलाची तातडीने दुरुस्ती करून सदर पुलाचा नवीन बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.दरम्यान, सन २००९ मध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर सत्तांतर होऊन दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे हे निवडून आले होते.गत पाच वर्षात या पुलाच्या नवीन बांधकामाच्या सहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला तत्वत: मंजुरी मिळाली आहे.या दरम्यान दुरुस्त केलेल्या पुलाचा मध्यवर्ती भाग गतवर्षी पुन्हा खचल्याने त्या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे.