शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची छेड काढल्यावरून दोन गटांत धूमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST

भुसावळ : महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी केल्याची घटना शहरातील जाम मोहल्ल्यातील मच्छीवाडा भागात २९ रोजी ...

भुसावळ : महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी केल्याची घटना शहरातील जाम मोहल्ल्यातील मच्छीवाडा भागात २९ रोजी घडली. यात दोन्हीकडील सहा जण जखमी झाले असून, १६ जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये तेहरिन नासीर शेख (वय २५, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मावशी लल्ला ऊर्फ मौसीनाबी इब्राहीम मलिक (वय ३०) हिची रिजवान शेख ऊर्फ टिल्लू याने छेड काढली असता, फिर्यादीने याचा जाब विचारला. त्यास वाईट वाटल्याने रिजवान शेख ऊर्फ टिल्लू, शेख इमाम शेख गफुर, शेख तौहीफ शेख इमाम, शेख बिसमिल्ला शेख रहीम, गुड्डु (चुरण विकणारा), शेख इरफान शेख रहीम, शेख इमरान यांनी तेहरिन नासीर शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी शेख इरफान शेख रहीम याने फिर्यादीस लोखंडी रॉडने डोक्यास मारहाण केली. यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फिर्यादीत शेख इम्रान शेख रहीम (वय ३२, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरातील लोक हे आरोपींच्या घरातील स्त्रियांची छेड काढतात, असा गैरसमज झाला. यामुळे आरोपी तेहरीन शेख, तोहीफ शेख, उबेद शेख, आकीब शेख, जशीन शेख फरीद मच्छीवाला यांची दोन मुले व गंगा मच्छीवाला यांचा मुलगा यांनी फिर्यादी शेख इम्रान यांना आकीब शेख यांने लोखंडी रॉडने तर उबेद शेख याने चाकूने डाव्या हातावर मारुन जखमी केले. या सर्वानी फिर्यादी यांचा भाऊ रिजवान यास मारहाण करून जखमी केले. तसेच तेहरीन याने फिर्यादी यांचा भाऊ बिसमिल्ला यास जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार मारली असता ती त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारुन गंभीर दुखापत केली. तसेच इरफान शेख यासही मारहाण करुन फिर्यादी यांच्या घरात येऊन सलमान याने फिर्यादी यांचे वडील रहीम यांच्या डोक्यावर रॉडने मारुन जखमी केले. तसेच घरातील सामानाची तोडफोड करुन स्त्रियांनासुद्धा मारहाण केली. जखमींना गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, यात पाच जण जखमी झाले असून, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहे.