शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 17:40 IST

24 रोजी उद्घाटन : महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र

ठळक मुद्दे दिग्गज विचारवंत सहभागी होणार संमेलनाचे विचारसूत्र महिलाच

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या पाश्र्वभूमीवर सहावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन जळगाव येथे 24 सप्टेंबर रोजी  सकाळी 9 ते संध्याकाळी सहा या वेळेत कांताई सभागृहात होणार आहे.  यावेळी दिग्गज विचारवंत सहभागी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजीद शेख यांनी मंगळवारी दुपारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे प्रमुख संयोजक मुकूंद सपकाळे, जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकमल पाटील, वासंती दिघे,  वैशाली पाटील, अशफाक पिंजारी, फईम पटेल, डॉ. शरीफ शेख, सुधाकर पाटील, प्रा. दिंगबर कटय़ारे उपस्थित होते.प्रगतीशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती आणि पुरोगामी समविचारी संघटना यांच्या संयुक्तविद्यमाने भारतर} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  सर्वसामान्य नागरिकांपयर्ंत पोहचावे या हेतूने एकूण 10 संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतार्पयत नागपूर, नाशिक, पुणे, भोर, नांदेड येथे हे संमेलन झाले. आता जळगावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती, जिल्हा महिला असोसिएशन आणि पुरोगामी समविचारी संघटनेच्यावतीने 24 रोजी सहावे संमेलन होणार आहे.  उद्घाटन प्रा. डॉ. अंजली मायादेव आंबेडकर यांच्याहस्ते होणार आहे.  त्यानंतर त्यांचे बीज भाषण होईल.यावेळी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर प्रथम सत्रात ‘हिंदू कोड बिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ याविषयावर प्रा. श्रुती तांबे तर दुस:या सत्रात ‘अल्पसंख्यांक स्त्रीया आणि संविधान’ या विषयावर विचारवंत डॉ. रजिया पटेल, तिस:या सत्रात ‘स्त्री शिक्षणाची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर डॉ. भारती पाटील, ‘जागतिकीकरणाचे स्त्रीयांवरील परिणाम’ या विषयावर प्रा. विनया मालती हरि तर समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. पुष्पा भावे, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याचे  पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.  नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

संमेलनाचे विचारसूत्र महिलाच या संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे, महिलांच्या मानवी जीवन जगण्याच्या हक्कासाठी उपयोगी ठरणारा दिशादर्शक दृष्टीकोन ठेवून, महिलांना केंद्रबिंदू मानून संमेलनाचे विचारसूत्र महिलाच आहे.