शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडय़ातून चोरलेल्या सहा दुचाकी जप्त

By admin | Updated: April 15, 2017 00:24 IST

अमळनेर : संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात

अमळनेर : एका अल्पवयीन मुलाकडून  चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व दुचाकी शिंदखेडा येथून चोरलेल्या असून, त्याची किंमत चार लाख रुपये आहे.शिंदखेडा (ता.धुळे) येथील एक 17 वर्षीय मुलगा शहरातील शिरुड नाका भागात कॉलेजचा विद्यार्थी म्हणून भाडय़ाच्या खोलीत राहत असून तो दुचाकी चोरतो, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन 13 रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने शिंदखेडा येथून दुचाकी चोरून आणल्या असल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी तो राहत असलेल्या भाडय़ाच्या खोलीच्या भिंतीलगत दडवून ठेवल्या होत्या. तर काही दुचाकी या शहरातील केलेनगर भागातील मोकळ्या बखळ जागेतील काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या होत्या. गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, चंद्रकांत गोसावी, पोलीस नाईक विजय साळुंखे, जनार्दन पाटील, विशाल चव्हाण यांनी या दुचाकींचा पंचनामा करून त्या ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व दुचाकींची किंमत चार लाख रुपये आहे. यातील काही दुचाकींच्या नंबर प्लेट बदलविण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ व त्यांच्या पथकाने केली आहे. संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.दरम्यान, हा गुन्हा व जप्त केलेल्या दुचाकी शिंदखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तर अल्पवयीन आरोपीची धुळे येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे.                       (वार्ताहर)