शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधून कापूस व्यापा-याचे सहा लाख लांबविणा-या चोरट्याला जळगावातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 20:26 IST

जळगाव पोलिसांच्या रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) याने औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये कापूस व्यापा-याची दुचाकीची डिक्की फोडून त्यातील कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचे उघड झाले असून रविवारी औरंगाबाद पोलिसांनी जळगावात येऊन हाड्याला ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे औरंगाबाद पोलिसांनी घेतले ताब्यात  दुचाकी डिक्की फोडून लांबविली होती रक्कमस्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमत जळगाव दि,१२ : जळगाव पोलिसांच्या रेकार्डवर सराईत गुन्हेगार असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव) याने औरंगाबाद शहरातील वाळूजमध्ये कापूस व्यापा-याची दुचाकीची डिक्की फोडून त्यातील कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपयांची रोकड लांबविल्याचे उघड झाले असून रविवारी औरंगाबाद पोलिसांनी जळगावात येऊन हाड्याला ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप पंढरीनाथ भवार (वय ३४, रा.लांझी वाळूज, ता.गंगापूर जि.औरंगाबाद) यांनी शेतकºयांकडून विकत घेतलेला १४० क्विंटल कापूस गुजरातमध्ये विक्री केला होता. त्याचे ६ लाख १६ हजार १०० रुपये औरंगाबाद येथील भावेशकुमार कल्लुभाई पटेल यांच्याकडे जमा केली होती. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ही रक्कम भवार यांनी लाल रंगाच्या बॅगेत टाकून दुचाकीच्या(क्र. एम.एच.२० बी.पी.४१३७) डिक्कीत ठेवली. त्यानंतर वाळूजमधील ओयासिस चौकातील गणेश टायर्स येथे ट्रॅक्टरचे दुरुस्तीचे काम करीत असलेल्या वडीलांकडे सायंकाळी पावणे पाच वाजता भवार पोहचले. तेथे दुकानदाराशी चर्चा करीत असतानाच महागड्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी दुचाकीची डिक्की फोडून त्यातील रोकड लांबविली. दुकानातील कर्मचाºयाने हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग केला,मात्र उपयोग झाला नाही.याप्रकरणी वाळूज, एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.औरंगाबाद पोलीस धडकले जळगावातगुन्हा दाखल झाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी गुन्ह्याची पध्दत लक्षात घेता जळगाव, नाशिक, जालना येथील पोलिसांकडून माहिती घेतली. जळगावात अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याचे समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. हाड्याचे फोटो तसेच फिर्यादीने दिलेले वर्णन तसेच तांत्रिक पुरावे हे सर्व एकत्र आल्याने उपनिरीक्षक विजय जाधव यांचे पथक रविवारी जळगावात धडकले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने हाड्याला दुपारी ताब्यात घेण्यात आले. कुराडे यांनी त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पथक त्याला घेऊन औरंगाबादला गेले.