शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

सहा कुटुंब बालंबाल बचावले

By admin | Updated: September 2, 2014 16:53 IST

घराचे नुकसान झाल्यामुळे घरातील सामान बाहेर काढला तरी चाळीतील नागरिकांनी गणरायाची ज्या ठिकाणी स्थापना केली होती तेथील मूर्ती न हलवता सकाळी बाप्पाची आरती म्हटली.

जळगाव - घराचे नुकसान झाल्यामुळे घरातील सामान बाहेर काढला तरी चाळीतील नागरिकांनी गणरायाची ज्या ठिकाणी स्थापना केली होती तेथील मूर्ती न हलवता सकाळी बाप्पाची आरती म्हटली. गणरायाने आपल्याला 'तारले' असा सूर नागरिकांच्या मुखातून निघाला. हलाखीची परिस्थिती आसोदारोडवरील वडामया चाळीत राहणारे नागरिक मजुरीचे काम करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एकाच घरात पार्टिशन टाकून दोन ते तीन कुटुंब येथे राहतात. त्यातच घरांचे नुकसान झाल्यामुळे भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ४0 वर्षांपूर्वीचा वृक्ष तब्बल ५0 फूट उंचीचे झाड घरावर पडले ते सुमारे ४0 वर्षांपूर्वीचे आहे, अशी माहिती चाळीतील नागरिकांनी दिली.या झाडाची सणवाराला मनोभावे पूजा केली जात होती. अचानक हे झाड उन्मळून पडणार अशी कल्पनादेखील कुणी केलेली नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अंदाज न आल्याने संस्कार उघड्यावर आले आहेत. बेफिकीर क्रॉम्प्टन कंपनीविद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील नागरिकांनी क्रॉम्प्टन कंपनीत रात्री संपर्क साधला असता आमचा काहीही संबंध नसल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. दिवसभर वृक्ष बाजूला करण्याचे काम सुरू असतानादेखील क्रॉम्प्टन कंपनीचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. घरावर पडलेले वृक्ष काढून घेण्यासाठी मनपा कर्मचारी सोमवारी सकाळी ७.३0 वाजता या परिसरात दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत घरांवर पडलेले वृक्ष बाजूला करण्याचे काम मनपा कर्मचारी करीत होते. दिवसभर सुरू होते काम सहा कुटुंबीयांचे संसार उघड्यावर आल्यामुळे रात्री झोपावे कुठे? जेवण करावे कुठे? उद्या आपले काय होणार? असे नानाविध प्रश्न नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या मनात रेंगाळत असताना चाळीतील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आणि नुकसानग्रस्त घरातील सदस्यांच्या रात्रभर मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था करून दिली. अन् वडामया भागात पिंपळाचे डेरेदार झाड उन्मळून पडल्याने घरे अशी दाबली गेली. सुदैवाने प्राणहानी टळली. जळगाव : दोन वेळेच्या पोटाची खळगी भरायची कशी?.. असा प्रश्न दररोज सतावत असलेल्या आसोदा रस्त्यावरील वडामया चाळीतील सहा कुटुंबीयांच्या घराच्या छतावर डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्यामुळे या कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने अनेकांचे प्राण बालंबाल वाचले आहेत. शहरासह परिसरात रविवारी दुपारपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. सायंकाळी दमदार पावसाच्या सरी सुरू झाल्यानंतर वडामया भागात पिंपळाचे डेरेदार झाड उन्मळून पडल्याने सहा कुटुंबीयांच्या घराचे नुकसान झाले आहे. मुकामार बसलाडेरेदार वृक्ष कोसळले त्या वेळी राजेंद्र सोमा कोळी (वय ४0) हे घरात बसलेले होते. त्यांच्या घराच्या पत्र्यावर वृक्ष पडल्यामुळे पत्रा व लाकडाचा जोरात मार त्यांच्या पाठीला व पायाला लागला. त्यात त्यांना जोरात मुकामार लागला आहे. त्यांच्या घराच्या बाजूला व समोर राहत असलेल्या अलका राजेंद्र कोळी, विमल सुरेश कोळी, शीलाबाई सुनील सैंदाणे, छायाबाई बहादूर राजपूत, प्रमिलाबाई चुडामण सैंदाणे व रत्नाबाई विलास बाविस्कर यांची घरे दाबली गेली आहेत. ३0 तास विद्युत पुरवठा खंडित रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गणरायाची आरती सुरू असताना जोरदार वीज पडल्यासारखा आवाज झाला. तेव्हा घरांवर वृक्ष पडल्याचे नागरिकांना दिसले. वृक्ष पडल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या. त्यामुळे तब्बल ३0 तास वीजपुरवठा खंडित होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत वृक्ष काढण्याचे काम सुरू होते.